Join us
Daily Top 2Weekly Top 5

मस्तानी दीपिका पादुकोणने नशेत केला ‘तमाशा’; फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 19:23 IST

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी आयोजित केलेल्या एका पार्टीत दीपिका पादुकोण हिने नशेत चांगलाच ‘तमाशा’ केल्याची बातमी समोर येत आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक दीपिकाचा एक फोटो समोर आला असून, त्यामध्ये ती नशेत दिसत आहे. तिच्या या अवस्थेतील फोटो फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने, दीपिकाने पार्टीत नशा तर केली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या फोटोत दीपिका व्यतिरिक्त करण जोहर, मनीष मल्होत्रा, सिद्धार्थ मल्होत्रा दिसत आहेत. खरं तर फोटोत केवळ दीपिकाच नव्हे तर सर्वच नशेत दिसत आहेत. मात्र दीपिकाचा अवतार इतरांच्या तुलनेत जरा जास्तच दिसत आहे. दीपिकाचा हा फोटो बघून असे वाटत आहे की, तिने पार्टीत चांगलाच ‘तमाशा’ केला असावा. दरम्यान, दीपिकाचा या अवतारातील फोटो सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, ही पार्टी मनीष मल्होत्राच्या घरी आयोजित केली होती. ज्याठिकाणी दीपिका, करण आणि सिद्धार्थ पाहोचले होते. या सर्वांनी पार्टी चांगलीच एन्जॉय केली. या फोटोमुळे सध्या दीपिकाला ट्रोल केले जात असून, सोशल मीडिेयावर तिच्या या फोटोला उलटसुलट कॉमेण्ट दिल्या जात आहेत. सध्या दीपिका तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, नवरात्रीच्या अगोदरच तिचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. तिच्या या लूकचे सर्वांनी कौतुक केले. परंतु आता या फोटोमुळे ती नेटिझन्सच्या संतापाला बळी पडत आहे.  दरम्यान, या चित्रपटात ती राणी पद्मावतीच्या भूमिका साकारत आहे. तिचे रॉयल दागिने आणि कपडे खूप वजनदार असून, या लूकमध्ये त्याचा साज स्पष्टपणे दित आहे. शिवाय तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत असल्याने तिच्यावर कालपर्यंत कौतुकाचा वर्षाव केला जात होता. परंतु आता हा फोटो समोर आल्याने नेटकºयांनी संताप व्यक्त करताना हीच काय राणी पद्मावती, असा सवाल उपस्थित केला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले असून, लवकरच हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.