Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रभासने स्वत:बद्दल सांगितल्या अनेक गोष्टी! वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:26 IST

‘बाहुबली2’नंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता प्रभास आज सुपरस्टार आहे. पण हे स्टारपण मिरवायचे कसे, हे जर तुम्ही प्रभासला ...

‘बाहुबली2’नंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता प्रभास आज सुपरस्टार आहे. पण हे स्टारपण मिरवायचे कसे, हे जर तुम्ही प्रभासला विचारले तर त्याच्याकडे याचे उत्तर नाही. कारण प्रभास स्वभावाने अतिशय लाजरा आहे.पडद्यावर आत्मविश्वासाने वावरताना दिसणारा प्रभास ख-या आयुष्यात अगदीच साधा, सरळ आणि भोळा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.   कॅमे-यासमोर प्रभास जराही कम्फर्टेबल नसतो. कॅमे-यासमोर त्याला लाजायला होते.आज प्रभास सुपरस्टार असला तरी काही वर्षांपूर्वी त्याने याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मनोरंजन दुनियेत येण्याचा त्याचा कुठलाही इरादा नव्हता. सुरुवातीपासून प्रभासला बिझनेसमॅन बनायचे होते. पण आज ‘बाहुबली’नंतर प्रभास जगात लोकप्रीय झाला आहे. एका मुलाखतीत प्रभासने अशा काही गोष्टी सांगितल्यात की, त्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.प्रभास म्हणाला, मी सार्वजनिक कार्यक्रमात कमालीचा दक्ष असतो. स्टारडम सांभाळणे आत्ता कुठे मी श्कितो आहे. अजूनही लोकांसमोर मला अवघडल्यासारखे होते. लोकांनी माझा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा असते.पण मला लोकांना सामना करावा लागू नये, असे मला वाटते.तो म्हणाला, गेल्या १३ ते १४ वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात आहे. पण स्टारडम कसे सांभाळायचे हे मला अजूनही कळलेले नाही. आपला हिरो बाहेर येत नाही, म्हणून चाहते नाराज होता. अर्थात आता माझ्या या स्वभावावर मात करण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत.प्रभासने सांगितले की, माझे वडील अप्पलपती सूर्य नारायण राजू प्रसिद्ध निर्माते आहेत. माझे काका कृष्णम राजू अप्पलपति यांनीही तेलगू सिनेमात मोठे नाव कमावले आहे. त्यामुळे मी ही स्वाभाविकपणे अभिनयक्षेत्रातच येईल, याची अनेकांना खात्री होती. पण आधी मी या क्षेत्रात येण्यास नकार दिला होता. मी इतका लाजाळू आहे. मी अभिनय कसा करू शकतो? असा विचार करून मी दोन-तीनदा पप्पांना नकार दिला होता. पण अचानक माझे मन बदलले आणि मी या क्षेत्रात आलो.ALSO READ : ​प्रभास अन् अनुष्का शेट्टी डिसेंबरमध्ये करणार साखरपुडा?प्रभासने सांगितले की, मी लाजाळू आहे तितकाच आळशीही. नोकरी मला झेपणारी नव्हतीच. त्यामुळे हॉटेल व्यवसायात करिअर करण्याचे मी ठरवले होते. पण एक दिवस काकांचा चित्रपट बघत होतो. अचानक काकांच्या जागी मी स्वत:ला पाहू लागलो व मग हळूहळू माझे मन बदलले. मला हिरो बनायचेयं, असे मी एकदिवस माझ्या मित्राला म्हटल्यावर तो हसायला लागला होता. त्याला १० दिवसांनंतर माझ्यावर विश्वास बसला. माझा हाच मित्र आज ‘साहो’चा निर्माता आहे.