Join us  

 सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 7:40 PM

कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे कंगना अचानक प्रकाशझोतात आलीयं. 

कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे कंगना अचानक प्रकाशझोतात आलीयं. सुरूवातीपासूनचं या चित्रपटाच्या मार्गात अनेक विघ्ने आलीत आणि एकदिवस अचानक ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या दिग्दर्शनाची सूत्रे कंगनाने आपल्या हातात घेतल्याची खबर आली. ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती़. अनेक जण ही बातमी पचवू शकले नाहीत. इतके कमी काय म्हणून ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या सेटवरून आणखी एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. ती म्हणजे, अभिनेता सोनू सूदने हा चित्रपट सोडल्याची. होय, कंगनाला वैतागून सोनूने हा चित्रपट सोडल्याचे कळतेय. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक म्हणून कंगनाची लूडबुड सोनू खपवू शकला नाही. सेटवरच्या तिच्या सूचना आणि दिग्दर्शनाचा कुठलाही अनुभव नसताना तिचा हस्तक्षेप पाहून ऐनवेळी सोनूने चित्रपट सोडल्याचा निर्णय घेतला. अर्थात कंगनाने मात्र वेगळाच दावा केला आहे.

कंगना म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला

सोनू सूदने कंगनाला वैतागून ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ सोडल्याचे मानले जात असले तरी कंगनाने मात्र वेगळाच दावा केला आहे. होय, गेल्यावर्षी मी व सोनू ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’सेटवर भेटलो होतो. तेव्हापासून आमची भेटचं नाही. मग माझ्यामुळे वैतागण्याचा प्रश्न येतोचं कुठे, असा सवाल कंगनाने केला आहे. तो ‘सिम्बा’च्या शूटमध्ये बिझी आहे. त्याने आम्हाला शूटींगसाठी डेट्स दिल्या होत्या. पण तो त्या तारखांना सेटवर आलाच नाही. निर्मात्यांनी त्याला चित्रपट दाखवला आणि लेखकांनी पॅचवर्कची कथाही ऐकवली. पण यानंतर त्याने मला भेटण्यास नकार दिला. खरे सांगायचे तर एका महिला दिग्दर्शिकेच्या हाताखाली त्याला कामचं करायचे नाही. माझ्यासाठी हे खूप धक्कादायक आहे. कारण तो माझा चांगला मित्र आहे. मी अखेरचे त्याला डेट्सबद्दल विचारले. यावेळी तुम्ही नव्या कलाकाराला घेऊ शकता, असे त्याने मला सांगितले. यानंतर मी जीशान अयुबच्या डेट्स घेतल्या. पण सोनूला हे कळले आणि त्याने लगेच स्टुडिओत फोन करून डेट्स देण्याची तयारी दाखवली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मी त्याच्यासोबत उर्मटपणा केला, अशी स्टोरी आता माझ्या कानावर येतेय. मी वर्षभरापासून त्याला भेटलेचं नाही तर उर्मटपणा करणारचं कशी? असे कंगना म्हणाली.‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’मध्ये सोनू सूदला कुस्तीचा एक सीन ठेवायचा होता. पण स्क्रिप्टमध्ये हा सीनचं नव्हता. त्याने व दिग्दर्शकाने स्क्रिप्टमध्ये नसलेले असे अनेक सीन्स शूट केले होते. त्याची बॉडी दिसावी, अशी त्याची इच्छा होती. लेखकांना हा सीन दाखवल्यावर त्यांनी स्वत: हा सीन चित्रपटात नकोच, अशी भूमिका घेतली. आता यात माझे काय चुकले? असा प्रश्नही तिने केला.

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीसोनू सूद