मनवीर गुर्जरला मिळाला चित्रपट, ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 13:07 IST
‘बिग बॉस’च्या यापूर्वीच्या सीझनमध्ये मनवीर गुर्जरने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मनवीरचे भविष्य उज्ज्वल आहे, हे त्याचवेळी सगळ्यांना कळले होते. ...
मनवीर गुर्जरला मिळाला चित्रपट, ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड डेब्यू!!
‘बिग बॉस’च्या यापूर्वीच्या सीझनमध्ये मनवीर गुर्जरने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मनवीरचे भविष्य उज्ज्वल आहे, हे त्याचवेळी सगळ्यांना कळले होते. ‘बिग बॉस10’ जिंकल्यानंतर मनवीर अनेक शोमध्ये दिसला. ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला. एकंदर काय तर ‘बिग बॉस’नंतर मनीवरला छोट्या पडद्यावरच्या अनेक संधी मिळाल्या होत्या. पण इतक्यात थांबेल, तो मनवीर कुठला? होय, छोट्या पडद्यावर ब-यापैकी बस्तान बसवल्यानंतर मनवीर मोठ्या पडद्याकडे वळला आहे. होय, लवकरच मनवीर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मनवीरच्या या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे, ‘आज की अयोध्या’. याच आठवड्यात या चित्रपटाचे मुहूर्त पार पडले. मनवीरसोबत या चित्रपटात श्रद्धा दास ही हिरोईन स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. श्रद्धा यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात दिसली होती. मनवीर गुर्जरच्या या चित्रपटात अभिनेता संजय मिश्रा हा सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.प्राप्त माहितीनुसार, या चित्रपटात श्रद्धा मनवीरच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली. वाराणसी आणि लखनौ येथे या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. या शूटींगसाठी लवकरच टीम रवाना होणार आहे. अरेमको मोशन पिक्चर्स आणि समीर मलिक यांची निर्मिती असलेला हा चित्रपट नरेश दुदानी दिग्दर्शित करतो आहे. अनंत कुमार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.ALSO READ : मनवीर गुर्जर अन् नीतिभा कौलची घराबाहेर बहरली मैत्री; डिस्को डान्सचा व्हिडीओ व्हायरलबिग बॉसच्या घरात मनवीर गुर्जरने शांत आणि संयमी वागणुकीने सा-यांची मने जिंकत सीझनचे विजेतेपद पटकावले होते. या घरात मनवीरचा वादाशी अपवादानेच सामना झाला. मात्र जितका वादग्रस्त तो त्या घरात ठरला नाही त्याहून कित्येक पटीने अधिक वादग्रस्त तो घरातून विजेता म्हणून बाहेर आल्यावर ठरला होता. होय, बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर मनवीर विवाहित असल्याचे समोर आले होते. इतकेच नाही तर त्याची तीन वषार्ची मुलगी असल्याचेही उघड झाले होते. पुढे या सगळ्या वादावर मनवीरने आपले मौन सोडले होते. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करुन त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता.