Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ मम्मा करिना कपूर तैमूरला देणार ‘हे’ संस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 16:40 IST

छोटा नवाब तैमूर अली खान याचे सध्या जाम लाडकौतुक सुरु आहे. मम्मी करिना कपूर खान आणि पप्पा सैफ अली ...

छोटा नवाब तैमूर अली खान याचे सध्या जाम लाडकौतुक सुरु आहे. मम्मी करिना कपूर खान आणि पप्पा सैफ अली खान यांचा लाडका तैमूर आधी नावामुळे चर्चेत आला. पण तैमूरच्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण या चर्चांकडे लक्ष देण्यापेक्षा तैमूरच्या पालन-पोषणाकडे लक्ष देणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. अलीकडे तैमूरची मम्मी करिना लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. या फॅशन शोच्या रॅम्पवर करिनाने मीडियाच्या प्रश्नांना मोनमोकळेपणाने उत्तरे दिलीत. साहजिक यावेळी तैमूरबाबतचा प्रश्न असणारच. बिनधास्त करिना कुठलेही आढेवेढे न घेता तैमूरबद्दलही बोलली. तैमूरला घरी सोडून बाहेर पडणे, माझ्यासाठी जरा कठीण आहे. पण मी नसताना पापा सैफ त्याची पूर्ण काळजी घेतो. तो तैमूरचे डायपरही बदलतो.त्यामुळे मी अगदी निश्चिंत बाहेर पडू शकते, असे करिनाने सांगितले.ALSO READ तैमुरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅमवर अवरतली करिना कपूरDamn Hot : करिना कपूर पुन्हा परतली आपल्या ग्लॅम अवतारात!तैमूरच्या पालन-पोषणाबाबत करिना अतिशय सजग आहे, खरे तर हे सांगायलाच नको. अलीकडे एका मुलाखतीत करिना जे बोलली, त्यावरून तरी हे स्पष्ट होते. मी तैमूरला नम्रपणा शिकवू इच्छिते. तैमूर नम्र स्वभावाचा असावा आणि लोकांची पर्वा न करता त्याने स्वत:चे आयुष्य स्वत:च्या अटींवर जगावे, असे मला वाटते. मी आणि सैफ आम्ही सेलिब्रिटी असूनही आमचे पाय जमिनीवर आहेत. तैमूरलाही आम्ही हीच शिकवण देऊ इच्छितो. त्याने आपले पाय कायम जमिनीवर ठेवावे. प्रत्येकाशी वागताना अगदी नम्रतेने वागावे आणि त्याला जे आवडेल, तेच करावे, अशी माझी व सैफ दोघांचीही इच्छा आहे.  इंटरनेटच्या व सध्याच्या फास्ट लाईफमध्ये हे जरा कठीण आहे. पण आम्ही हीच शिकवण तैमूरला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असे करिनाने या मुलाखतीत म्हणाली.