Join us

मामा गोविंदाचा भाच्ची रागिनी सोबत डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:40 IST

 बॉलीवूडचा ‘चीची’ म्हणजेच गोविंदा याला डान्समध्ये कोणी मात देऊ शकते का? नाही ना.. त्याच्याचप्रमाणे त्याची भाच्ची रागिनी खन्ना ही ...

 बॉलीवूडचा ‘चीची’ म्हणजेच गोविंदा याला डान्समध्ये कोणी मात देऊ शकते का? नाही ना.. त्याच्याचप्रमाणे त्याची भाच्ची रागिनी खन्ना ही देखील डान्समध्ये मास्टर आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्या दोघांनी ‘जस्ट फॉर चेंज’ म्हणून ‘व्हॉट इज युअर मोबाईल नंबर’ या ‘हसीना मान जायेगी’ चित्रपटातील गाण्यावर डान्स केला.चित्रपटाच्या सिग्नेचर स्टेपवर त्या दोघांनी डान्स केला. या दोन्ही गुणी कलावंतांना एकत्र डान्स करताना पाहणे म्हणजे एक पर्वणीच म्हणावी लागेल. गोविंदा आणि त्याचे दोन्हीही भाच्चे रागिनी आणि कृष्णा अभिषेक हे डान्सींगच्या बाबतीत चीची प्रमाणेच उत्कृष्ट आहेत.