Join us
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिका शेरावत चीनी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 10:49 IST

दीपिका पादुकोण व प्रियांका चोपडा या बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा हॉलिवूडमध्येही डंका वाजत आहे. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका ...

दीपिका पादुकोण व प्रियांका चोपडा या बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा हॉलिवूडमध्येही डंका वाजत आहे. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यावरही  चीनी अभिनेत्रीच्या शिक्का बसणार आहे. बॉलिवूडध्ये मागील अनेक दिवसापासून मल्लिका चर्चेत नाही. ‘टाइम रेडर्स’ या चीनी चित्रपटात   मल्लिकाने काम केले आहे. मे मध्ये ती या चित्रपटाला घेऊन कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली होती.हांगकांगचे डॅनियल ली हे या चित्रपटाचे दिगदर्शक आहेत. गतवर्षी या चित्रपटाची चीनमध्ये शुटींग करण्यात आली. दीपिकाने यासंदर्भात सांगितले होते की,  हा ५० मिलीयन डॉलरचा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ती यास नकार देऊ शकली नाही. या चित्रपटात असलेले स्टार कास्टही कमालीचे आहेत. चीनमध्ये बॉलिवूडची खूप उत्सुकता आहे. तसेच तिने ‘द मिथ’ मध्ये जॅकी चैन सोबत काम केलेले आहे. अजून एका चीनी चित्रपटाची बोलणी मल्लिका सोबत सुरु असल्याच्याही चर्चा आहे. तिच्यासाठी ते चांगले सुद्धा आहे. आजघडीला हॉलिवूडमध्ये दीपिका व प्रियंका जोरदार चर्चा आहे.   तर मल्लिका चीनमध्ये जात आहे.