Join us

ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये मलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोतील अदा पाहून चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:42 IST

मलायका अरोरा नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

मलायका अरोरा नेहमी तिच्या फोटो व लूक्समुळे चर्चेत असते. मग, जिम वर्कआऊटचा फोटो असेल किंवा फॅशन शोमधील रॅम्प वॉक वा पार्टीतील फोटो मलायका मीडियाचं व चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. तिच्या पर्सनल लाईफमुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच मलायकाने ट्रेडिशनल लूकमध्ये फोटोशूट केलं आणि हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

मलायकाने मोतींनी सजलेला लेहंगा परिधान केला आहे. त्यावर तिने ज्वेलरी घातलेली नाही. तिने डोळ्यात काजळ लावून लूक पूर्ण केला आहे.

 मलायकाने वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमधील फोटो शेअर केला आहेत. रोज पिंक कलरमधील लेहंग्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

कमी मेकअप आणि ज्वेलरी नसली तरीदेखील मलायका खूपच सुंदर दिसते आहे. 

काही दिवसांपूर्वी मलायकाने हेड स्टॅण्ड पोझमध्ये योगासन करतानाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.

तिच्या या फोटोवर तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी कमेंट केली होती. रणवीर सिंगने देखील मलायकाच्या फ्लेक्सिबल बॉडीचं कौतूक केलं होतं.

मलायका व अर्जुन कपूर त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात.

नुकतेच रणबीर कपूरच्या बर्थडे पार्टीत मलायका व अर्जुन कपूर एकत्र दिसले होते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूररणबीर कपूररणवीर सिंग