Join us

मलायका म्हणाली,‘ हॅप्पी बर्थडे अरबाज..!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:06 IST

अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांच्यात मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता. ते घटस्फोट घेणार का अशी चर्चा ‘बी’ ...

अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांच्यात मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता. ते घटस्फोट घेणार का अशी चर्चा ‘बी’ टाऊनमध्ये सुरू होती. सध्या तरी त्यांनी एकमेकांना थोडा वेळ दिला असून ते त्यांच्या दुराव्यानंतर प्रथम सलमानने दिलेल्या ईद पार्टीत भेटले होते.नुकताच अरबाज खानचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. त्यावेळी मलायका तर त्याच्यासोबत नव्हती. पण तिने इन्स्टाग्रामवर ते दोघे हसत हसत केक कट करतांनाचा फोटो पोस्ट केला आहे.आणि त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ हॅप्पी बर्थडे अरबाज...हॅपीनेस आॅलवेज.’ वेल, मलायका-अरबाज तुमच्यात काय गैरसमजुती झाल्या असतील तर होऊ द्या. पण, आता तुम्ही पुन्हा एकदा एकत्र या. आम्हाला तुम्हा दोघांना एकत्र आलेलं पहायचे आहे.’