दरम्यान, जेव्हा मलाइकाने पार्टीत हजेरी लावली, तेव्हा तिचे हा शॉर्ट ड्रेसमधील सौंदर्य बघून सर्वच दंग झाले. मलाइकाचे या अवतारातील काही फोटोज् सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले. परंतु नेटकºयांनी तिला नेहमीप्रमाणे या फोटोवरून ट्रोल केले. एका युजर्सनी लिहिले की, ‘आता चेहºयाची प्लास्टिक सर्जरी करून घे. आंटी आता बस करा, पोरगं जवान झालं आहे.’ तर दुसºया एका युजरने म्हटले की, ‘हे तुझ्या मुलासाठी चांगले नाही’ मलाइकांच्या या फोटोंना दिवसभर अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स दिल्या गेल्या.
वास्तविक कपड्यांवरून मलाइकाला ट्रोल करणे काही नवे नाही. यापूर्वीदेखील तिला बºयाचदा कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले. मात्र मलाइका याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे तिने बºयाचदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, मलाइकाने याचवर्षी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. मलाइका आणि अरबाजचा १५ वर्षांचा मुलगा असून, त्याचे नाव अरहान खान आहे. अरहानची कस्टडी मलाइकाकडे आहे. सध्या मलाइका इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी आगामी काळात ती काही रिअॅलिटी शोला जोडली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ‘दबंग’ सीरिजमध्येही ती पुन्हा सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे.