Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यात..."; अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर पुन्हा बोलली मलायका अरोरा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 22:45 IST

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. मनमोहक लूक्स आणि फिटनेससोबत मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेचा विषय ठरत असते.

नवी दिल्ली-

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. मनमोहक लूक्स आणि फिटनेससोबत मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेचा विषय ठरत असते. मलायकानं अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशीनशीपबाबत पुन्हा एकदा मनमोकळेपणानं भाष्य केलं. 

महिलांना त्यांच्या निवडीबाबत नेहमीच प्रश्न विचारले जातात. कोणत्या व्यक्तीसोबत तुम्ही राहिलं पाहिजे, कुणाला डेट करायला हवं या गोष्टींसाठी नेहमी कुणी ना कुणी महिलांना सल्ले द्यायला तयार असतं. तुलाही या गोष्टी ऐकाव्या लागल्या असतील आणि याचा सामना कसा केला? असा प्रश्न मलायका अरोरा हिला विचारण्यात आला. इंडिया टुडे कॉन्लेवमध्ये मलायला अरोरा उपस्थित होती. 

प्रेम म्हणजे प्रेम असतं..."ज्यावेळी मी घटस्फोट घेतला तेव्हाही मला विचारलं गेलं होतं की तू घटस्फोट का घेतलास? कारण घटस्फोटीत हा टॅग तुझ्यासोबत नेहमीच आता राहिल. मग घटस्फोटानंतर मला माझं प्रेम मिळालं तर लोकांनी म्हटलं की हिला कसं काय प्रेम मिळालं? मग आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला डेट करत असल्याबद्दल प्रश्न विचारले गेले. तू भानावर नाहीस असंही मला म्हटलं गेलं. पण मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की प्रेम हे प्रेम असतं आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं. तुम्ही प्रेमात आहात तर आहात", असं मलायका म्हणाली. 

तुम्ही तुमच्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला डेट करत आहात यानं काहीच फरक पडत नाही. तुम्ही खूश आहात की नाही हे जास्त महत्वाचं आहे. मी अत्यंत खूश आहे की मला समजून घेणारा पार्टनर माझ्यासोबत आहे. तो माझ्यापेक्षा वयानं लहान आहे तर ठीक आहे. उलट मला वाटतं की तो माझ्यापेक्षा तरुण आहे तर मलाही तसंच फील होतं. मी आनंदी आहे हेच माझ्यासाठी खूप आहे, असंही ती पुढे म्हणाली. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर