Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलाइका अरोराने बाली येथील ‘सनी संडे’चा सेल्फी केला शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:39 IST

सध्या मलाइका बाली येथे छोटेसे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. बालीमधील सनसेटचे काही फोटोज् तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यामध्ये ती कमालीची दिसत आहे.

हॉट अभिनेत्री मलाइका अरोरा हिला फिरायला खूप आवडते. तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंट विविध देशांतील तिने शेअर केलेल्या फोटोंवरून हे सिद्धही होते. मलाइका अरोरा बॉलिवूडमधील आयटम नंबरची अजूनही क्वीन असून, तिच्या या फोटोंवरून हे स्पष्ट होते. कारण फोटोंमध्ये मलाइकाच्या पोझ घायाळ करणाºया असून, तिचा फोटो चाहत्यांसाठी जणूकाही पर्वणीच ठरत असतो. असो, सध्या मलाइका बाली येथे छोटेसे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. बालीमधील सनसेटचे काही फोटोज् तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यामध्ये ती कमालीची दिसत आहे. त्याचबरोबर तिने बीचवर एक सेल्फी शेअर केला असून, त्यात तिचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. बॅकग्राउडमध्ये समुद्र दिसत असलेला हा सेल्फी शेअर करताना मलाइकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सनी संडे, इट्स रॅप!’ फोटोमध्ये मलाइका खूपच फ्रेश दिसत आहे. शिवाय तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना बालीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी साद घालणारा ठरत आहे. वास्तविक मलाइका इन्स्टाग्रामवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. कुठल्या ना कुठल्या कारणाने ती तिचे हॉट फोटो शेअर करीत असते. जिम सेशन असो वा पार्टी मलाइकाचा प्रत्येक फोटो चाहत्यांमध्ये अतिशय पसंत केला जातो.   काही दिवसांपूर्वी मलाइकाने एक कोलाज फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिने नेमका कोणता ड्रेस परिधान केला आहे, हे स्पष्ट होत नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘बाली सनसेट्स, बाली व्हेकेशन!’ तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड पसंत केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलाइकाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. एका युजरने तर असे म्हटले होते की, ‘सध्या ही गंदी औरत असेच करीत आहे. अगोदर एका मालदार व्यक्तीबरोबर लग्न करायचे, नंतर त्याच्याकडून पैसे उकळायचे, त्यानंतर त्या पैशांनी ऐशोआराम करायचा. जर तू कमाई करण्यास सक्षम आहेस तर तुला पोटगी कशाला हवी? मी जेंडरची नव्हे तर प्रामाणिक व्यक्तीचा आदर करतो’फील गुड फॅब्रिक नावाच्या युजर अकाउंटवरून आलेली कॉमेण्ट त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती. हा युजर एवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने पुढे असे लिहिले होते की, ‘तिच्या आयुष्यात फक्त तोकडे कपडे घालणे, ब्यूटी पार्लरला जाणे आणि सुट्या एन्जॉय करणे एवढेच उरले आहे. खरंच तुझ्याकडे काही कामधंदा आहे काय? की केवळ पतीच्या पैशांवर ऐश करीत आहेस?’ असा सवालही या युजरने उपस्थित केला होता. या कॉमेण्टमुळे मलाइका चांगलीच व्यथित झाल्याचेही समोर आले होते.