Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलाइका अरोराने कंगना राणौत वादावर म्हटले, ‘तिचा प्रॉब्लेम तिने सोडवावा, मला काही देणे-घेणे नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 21:59 IST

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेली अभिनेत्री कंगना राणौत हिने गेल्या काळात दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये अनेक दिग्गज स्टार्सवर हल्लाबोल केला. ...

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेली अभिनेत्री कंगना राणौत हिने गेल्या काळात दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये अनेक दिग्गज स्टार्सवर हल्लाबोल केला. ‘भाई-भतीजावाद, पुरुष कलाकारांच्या तुलनेत महिला कलाकारांना मिळत असलेला कमी मोबदला, करण जोहर, हृतिक रोशन, आदित्य पांचोलीसह नारीवाद यावर परखड मत व्यक्त करीत इंडस्ट्रीत एकच खळबळ उडवून दिली. कंगनाच्या या आरोपानंतर आता बॉलिवूडमध्ये चर्चा रंगू लागली असून, अनेक कलाकार त्यावर मत व्यक्त करीत आहेत. काही कंगनाच्या समर्थनार्थ बोलत आहेत तर काही कंगनाचा विरोध करताना दिसत आहेत. आता मलाइकानेही कंगनाच्या मुद्द्यावर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ती तिला पटेल असे फारसे दिसत नाही. एका इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या मलाइका अरोराला जेव्हा कंगनाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तिचे मत विचारण्यात आले, तेव्हा तिने कंगनाचे नाव न घेता म्हटले की, ‘हा सगळा तिचा प्रॉब्लेम आहे. मला दुसºया कोणाच्या प्रॉब्लेमविषयी काहीही देणे-घेणे नाही. कोणी काय म्हटले? यावरून माझ्या आयुष्यात काहीही बदल होणार नाही. त्यामुळे मी याप्रकरणी काहीही बोलू इच्छित नाही.’ पुढे बोलताना मलाइका म्हणाली की, ‘मला याविषयीची काहीही आयडिया नाही की, कोणी काय म्हटले? का बरं मी कोणाच्या मुद्द्यावर माझे मत व्यक्त करू? जर कोणी माझ्याविषयी काहीच बोलले नाही शिवाय कोणाच्या बोलण्यामुळे माझ्या आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही तर मग मी त्यावर कमेंट देऊच कशाला? त्यामुळे याप्रकरणी माझे काहीही मत नाही. ही तिची समस्या आहे, तिनेच ती बघावी. मला याविषयी काहीही फरक पडत नाही. यावेळी सोशल मीडियावर ट्रोलिंगविषयी मलाइकाला विचारले असता ती म्हणाली की, सोशल मीडियावर ट्रोल होण्यापासून वाचायचे असेल तर त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ट्रोल करणाºयांकडे अजिबातच लक्ष देऊ नये. मी याबाबतीत कोणालाही भाव देत नाही. मी जर अशा गोष्टींकडे लक्ष देत गेली तर मी माझ्या आयुष्यातील शांतता भंग होईल.