Join us  

Miss India 2022 : ट्रान्सपरंट ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहोचली सुपर ग्लॅमरस मलायका अरोरा, पण झाली ट्रोल...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 10:28 AM

Femina Miss India 2022, Malaika Arora : रविवारी मलायका मुंबईतील Femina Miss India 2022 इव्हेंटमध्ये पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या

बॉलिवूडची सुपर ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) जिथे जाते, तिथे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. रविवारी मलायका मुंबईतील Femina Miss India 2022 इव्हेंटमध्ये पोहोचली आणि तिला पाहून सगळे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. मलायकाच्या ड्रेसनं प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. होय, मलायका ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये या इव्हेंटला पोहोचली. गोल्डन कलरचा या डिझाईनर ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये मलायका कमालीची सुुंदर दिसत होती.

गळ्यात नेकपीस, मोकळे केस, न्यूड मेकअप असा तिचा क्लासी लुक होता. मलायकाने अतिशय आत्मविश्वासाने कॅमेऱ्याला पोझ दिल्यात. काहींना तिचा कॉन्फिडन्स आवडला. तिचा लुक आवडला. पण काहींनी मात्र नेहमीप्रमाणे मलायकाचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने मलायकाचा इव्हेंटमधील व्हिडीओ शेअर केला आणि तो पाहून अनेकांनी मलायकाला पुन्हा एकदा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तिला ‘सस्ती केंडल जेनर’ म्हणून ट्रोल केलं. काहींनी नेहमीप्रमाणे म्हातारी म्हणत डिवचलं. अनेकांना मात्र मलायकाने इम्प्रेस केलं. हॉट, ग्लॅमरस, सुंदर म्हणत तिचं कौतुक केलं.

खरं तर ट्रोल होणं हे मलायकासाठी नवीन नाही. कधी कपड्यांमुळे, कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे ती ट्रोल झालीये. मलायकाला याची पर्वा नाही. इव्हेंटमधील तिचा कॉन्फिडन्स हेच सांगणारा होता. मलायका आली आणि तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं..., हेच खरं.

मलायकाच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं तर दीर्घकाळापासून मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय. लवकरच हे कपल लग्न करणार असल्याचं मानलं जातंय. मलायका कालपरवाच व्हॅकेशनवरून परतली आहे.  बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत ती पॅरीसला व्हॅकेशनवर गेली होती. या व्हॅकेशनचे काही रोमॅन्टिक फोटोही मलायका व अर्जुनने शेअर केले होते.

टॅग्स :मलायका अरोरामिस इंडियाअर्जुन कपूर