मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत इटलीत साजरा केला वाढदिवस, लवकरच करणार नात्याची अधिकृत घोषणा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 15:44 IST
‘प्यार किया तो डरना क्या’ अशा थाटात मलायका व अर्जुन अलीकडे जगासमोर वावरू लागले आहेत. ताजी खबर खरी मानाल तर हे कथित कपल लवकरच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करू शकते.
मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत इटलीत साजरा केला वाढदिवस, लवकरच करणार नात्याची अधिकृत घोषणा!!
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी दबक्या आवाजातील चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण आता ही चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. याला कारणही तसेच आहे. कारण मलायका-अर्जुनही आता फार काही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. ‘प्यार किया तो डरना क्या’ अशा थाटात मलायका व अर्जुन अलीकडे जगासमोर वावरू लागले आहेत. ताजी खबर खरी मानाल तर हे कथित कपल लवकरच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करू शकते.
काल २३ आॅक्टोबरला मलायकाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस मलायकाने इटलीत साजरा केला. तोही अर्जुन कपूरसोबत. आज सकाळी अर्जुन व मलायका दोघेही इटलीहून परतले. मुंबई विमानतळावर ते एकत्र दिसले. मात्र त्यांनी मीडियाला एकत्र पोझ देणे टाळले.मलायका व अर्जुनला आत्तापर्यंत अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. गेल्या काही महिन्यांतील त्यांच्यातील केमिस्ट्री तर बघण्यासारखी आहे. त्यामुळे आपले नाते जगापुढे मान्य करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे कदाचित दोघांनाही वाटते आहे.अलीकडे ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मंचावर दोघांचीही केमिस्ट्री स्पष्टपणे दिसली होती. दोघेही हातात हात घालून मंचावर दिसले. मलायका ही इंडियाज गॉट टॅलेंटची जज आहे़त्यापूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्येही अर्जुन व मलायका यांनी एकत्र हजेरी लावली होती. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर अर्जुन व मलायका यांच्यातील जवळीक ख-या अर्थाने वाढली असल्याचे मानले जात आहे.