Join us

मलायका-अरबाज गोव्यात आले एकत्र; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 13:43 IST

२०१६ हे वर्ष ‘बी टाऊन’मधील अनेक कपल्सच्या घटस्फोटांनी गाजलं. त्यातली घटरस्फोट घेणारी सर्वांत हॉट जोडी म्हणजे मलायका अरोरा (खान?) ...

२०१६ हे वर्ष ‘बी टाऊन’मधील अनेक कपल्सच्या घटस्फोटांनी गाजलं. त्यातली घटरस्फोट घेणारी सर्वांत हॉट जोडी म्हणजे मलायका अरोरा (खान?) आणि अरबाज खान. इतरांपेक्षा मलायका-अरबाज या जोडीच्या घटस्फोटाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ‘ब्रेक-अप’ आणि ‘घटस्फोट ’ घेतल्यानंतर देखील अनेक जोड्या एकत्र आल्या. मात्र, मलायका आणि अरबाज यांच्यात अजूनही अबोला आहेच. पण, अलीकडेच ते गोव्यात फ्रेंडससोबत पार्टीटाईम सेलिब्रेट करण्यासाठी भेटले. त्यांनी काही फोटो सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यात ते दोघे एकमेकांसोबत फार काही आनंदी असल्यासारखे दिसत नव्हते. अमृता अरोराने आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत ते दोघे एकत्र येतील असा अंदाज होता. मात्र, येथे सर्वांच्या निराशा झाल्या.                                                                                       मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची फाईल दाखल केल्यानंतर त्यांनी येथील समुपदेशनाच्या काही सेशन्सला उपस्थिती नोंदवली. कायदेशीर नियमानुसार, एकदा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली की, सहा महिन्यातून एकदा दोघांनाही समुपदेशनच्या सत्राला यावेच लागते. त्यानंतर जर कोर्टाला त्यांच्यातील वाद निवळण्याची चिन्हे दिसली. तरच ते जोडपं पुन्हा पूर्ववत आयुष्य जगू शकतं. नाहीतर, घटस्फोट निश्चितच असतो. मात्र, या दोघांवर समुपदेशन सेशन्सचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसतेय. गोव्यात भेटल्यानंतर त्या दोघांनी कमीत कमी एकमेकांसोबत मित्रांप्रमाणे बोलणे तरी अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या एकमेकांकडे पाहण्याच्या अनोळखी नजरांमुळे मित्रमैत्रिणींमध्ये कुजबुज सुरू झाली. सगळ्यांसोबत असून देखील त्यांच्यात एकमेकांबद्दल अस्वस्थता कायम होती.                                                                                                                                    लग्नाच्या तब्बल १७ वर्षांनंतर मलायका अरोराने तिचे खान हे आडनाव लावणे टाळून त्यांच्या घरातून बाहेर पडणेच पसंत केले. कधी पार्टी तर कधी बर्थडे बॅशच्या निमित्तानं ते एकत्र येत असतात. मात्र, त्यांच्यातील वाद निवळून वैवाहिक आयुष्य केव्हा पूर्ववत होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.