‘या’ अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी निर्मात्यांना तैनात करावे लागले २०० बाउंसर्स, वाचा काय आहे प्रकरण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 18:53 IST
साउथ अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या आगामी ‘वेलइक्करन’ या तामिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शिवा कार्तिकेयन मुख्य ...
‘या’ अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी निर्मात्यांना तैनात करावे लागले २०० बाउंसर्स, वाचा काय आहे प्रकरण!
साउथ अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या आगामी ‘वेलइक्करन’ या तामिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शिवा कार्तिकेयन मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या शूटिंग सध्या राजस्थानमधील अजमेर आणि किशनगढ येथे सुरू आहे. याठिकाणी तिच्यावर एका गाण्याची शूटिंग केली गेली. रिपोर्ट्सनुसार, ‘शूटिंग आणि नयनतारा बघण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. गर्दीचा रोष पाहता काही विपरीत घडू नये म्हणून निर्मात्यांनी नयनताराच्या सुरक्षेसाठी तब्बल दोनशे बाउंसर्स नियुक्त केले आहेत. राजस्थानमधील किशनगढ भागात मार्बल डंपिंग यार्डजवळ चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. याठिकाणी काही सीन आणि गाण्याच्या शूटिंगसाठी काश्मीरचेही सेट बनविण्यात आले आहेत. गाण्याच्या शूटिंगचे बरेचसे फोटोदेखील इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नयनतारा पांढºया रंगाच्या गाउनमध्ये प्रिसेंस लूकमध्ये बघावयास मिळत आहे. या व्यतिरिक्त तिच्या हातात एक रिंगही दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘नयनताराचा हा चित्रपट त्या दोन लोकांची कथा आहे ज्यामध्ये दोघांची ओळख सारखीच असून, ते अन्नपदार्थांमधील भेसळीच्या विरोधात लढा देत असतात. चित्रपटात फहाद फासिल यांचीही भूमिका आहे. जे या चित्रपटाच्या माध्यमातून तामिळ डेब्यू करीत आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. नयनतारा अखेरीस याच वर्षी आलेल्या ‘डोरा’ या तामिळ चित्रपटात बघावयास मिळाली होती. चित्रपटात तिच्यासोबत थंबी रमैया, हरीश उथमन आणि सुली कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर शिवा कार्तिकेयन २०१६ मध्ये आलेल्या ‘रेमो’ या चित्रपटात अखेरीस झळकला होता. त्याच्यासोबत कीर्ती सुरेश आणि सतीश यांनी काम केले होते.