Join us

महेश बाबूने पत्नी नम्रता शिरोडकरसोबतच्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा, लग्ना आधीचे क्रश ही केले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:17 IST

नम्रता महेश बाबूपेक्षा जवळपास 3 वर्षांनी मोठी आहे.

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का ?, महेश बाबू फक्त 26 वर्षांचा होता जेव्हा त्याचे क्रश नम्रता शिरोडकरवर होते. सोशल मीडियावर आयोजित प्रश्न उत्तरांच्या सत्रात महेश बाबूने अनेक खुलासे केले,  जेव्हा त्याच्या चाहत्यांपैकी एकाने त्याला विचारले की त्याचे कोणावर कधी क्रॅश होते का? त्याला उत्तर देताना महेश म्हणाला, "हो, मी वयाच्या  26 वर्षांचा असताना होते. त्यानंतर मी तिच्याशी लग्न केले.  

2000 साली तेलुगू सिनेमा वापसी च्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास 5 वर्षे दोघ एकमेकांना डेट करत होते. 2005मध्ये नम्रता आणि महेश बाबू लग्नाच्या बेडीत अडकले.

नम्रता महेश बाबूपेक्षा जवळपास 3 वर्षांनी मोठी आहे. फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. मात्र लग्नानंतर नम्रता सिनेमांमध्ये कमी आणि संसार जास्त रमली.

महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :महेश बाबूनम्रता शिरोडकर