Join us

‘कौन तुझे’ गाण्यात महेंद्रसिंग-साक्षीच्या प्रेमाचा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 10:15 IST

महेंद्रसिंगचे संघर्षात्मक आयुष्यासह त्याची प्रेमकहाणी कशी फुलत गेली ? हे या गाण्यातून सुंदरप्रकारे दाखवण्यात आले आहे.

 ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील ‘बेसबरियाँ’ हे गाणे आऊट केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांच्या प्रेमाचे साक्षीदार असलेले ‘कौन तुझे’ हे गाणे आऊट करण्यात आले.सुशांतसिंग राजपूत आणि कायरा अडवाणी यांनी धोनी आणि साक्षी यांची प्रेमकहाणी ‘कौन तुझे’ या रोमँटिक गाण्यातून मांडली आहे. हे गाणे पलक मुंछल हिने गायले असून अमाल मलिक यांनी संगीतबद्ध केले आहे.महेंद्रसिंगचे संघर्षात्मक आयुष्यासह त्याची प्रेमकहाणी कशी फुलत गेली ? हे या गाण्यातून सुंदरप्रकारे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत कायरा अडवाणी आणि अनुपम खेर असून चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.">http://