Join us

'महाभारत' मालिकेत 'अर्जुन' भूमिका साकारलेला अभिनेता आता काय करतो? चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं अन्…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 10:38 IST

'महाभारत' मालिकेत 'अर्जुन' भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा मुलगा बॉलिवूडमध्ये नाव कमावतोय.

पौराणिक कथांमध्ये 'महाभारत'चं अनन्य साधारण महत्त्व आहे. ८०-९० च्या काळात बी. आर. चोप्रा यांनी 'महाभारत' मालिकाच्या माध्यमातून हा इतिहास प्रेक्षकांसमोर सादर केला. त्याकाळी ही मालिका तुफान गाजली. इतकंच नाही तर आजही या मालिकांची क्रेझ पाहायला मिळते.  लॉकडाउनमध्ये तर या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. इतकंच काय, या मालिकेतील कलाकारांना आजही त्यांच्या मूळ नावांपेक्षा त्यांनी साकारलेल्या पात्रांच्या नावांनी ओळखलं जातं. त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे 'अर्जून'.

'महाभारत'मधील दुर्योधन, युधिष्ठिर, शकुनी मामा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच अर्जुनचं पात्रही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं. जसं गब्बरसिंग म्हटलं की अमजद खान आठवतो, मोगॅम्बो म्हटलं की अमरीश पुरी आणि राज-राहुल म्हटलं की शाहरुख खान. तसंच अर्जुन म्हटलं की आठवतात ते म्हणजे फिरोज खान. अर्जुनाची भूमिका साकारलेले अभिनेता फिरोज खान यांना  'अर्जून' या भूमिकेमुळे इतकी लोकप्रियता मिळवली की त्यांनी आपलं नावच बदलून 'अर्जुन' ठेवलं. प्रेक्षक इतके भारावले होते की अनेकांना वाटत होतं की त्यांचं खरे नावही अर्जुनच आहे.

फिरोज खान यांनी मालिकांव्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका देखील साकारली आहे. ९० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला. त्यांची पत्नीचं नाव कश्मीरा असं असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा जिब्रान खान हा सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. नुकताच तो 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटात झळकला होता. त्याआधी तो 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून झळकला होता. तर  सध्या फिरोज खान चित्रपटांमध्ये दिसत नसले तरी ते सोशल मीडियावर सक्रीय असतात.  यामाध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. 

टॅग्स :सेलिब्रिटीमहाभारत