Join us

‘माधुरी’ साठी आजही रितेशला होते ‘धक धक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 11:22 IST

 ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीत-नेने ही अनेक कलाकारांची ड्रीमगर्ल आहे. तशीच रितेश देशमुखलाही ती प्रचंड आवडते. तिच्यामुळे त्याला आजही ‘धकधक’ ...

 ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीत-नेने ही अनेक कलाकारांची ड्रीमगर्ल आहे. तशीच रितेश देशमुखलाही ती प्रचंड आवडते. तिच्यामुळे त्याला आजही ‘धकधक’ होते असे तो सांगतो. त्याला विचारण्यात आले की,‘ अशी कोणती हिरोईन आहे की, जिच्यासाठी तो आजही ‘सिंगल’ होऊ शकतो?तेव्हा त्याने सांगितले,‘माधुरी. ती माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे. तिच्यापुढे मी कुणालाही पाहू शकत नाही. जेव्हा आपण सौंदर्य आणि हुशारी याविषयी बोलू तेव्हा तिच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही. मी आजही तिच्यावर खुप प्रेम करतो आणि तिचा एक कलाकार म्हणून आदरही वाटतो.’