Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितच्या बहिणीदेखील दिसायला आहेत सुंदर, फोटो समोर येताच झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 13:45 IST

माधुरी दीक्षितचा बहिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

आपल्या सौंंदर्यानं लाखों लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. माधुरी नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच सोशल मीडियावर फॅमिली व तिचे फोटो शेअर करून अपडेट देत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते. मात्र आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितच्या बहिणीबद्दल सांगणार आहोत जे नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या आहेत. 

कदाचित तुम्हाला माहित असेल की माधुरी दीक्षितला दोन बहिणी आहेत रुपा दीक्षित आणि भारती दीक्षित. तसेच तिला एक भाऊदेखील आहे ज्याचे नाव अजित दीक्षित आहे. माधुरीचे स्टारडम इतके जास्त आहे की कोणाचंच तिच्या खासगी आयुष्याकडे लक्ष गेले नाही.

कधीच कोणी माधुरी दीक्षितच्या कुटुंबात कोण कोण आहे, हे जाणण्याचा प्रयत्न केला नाही. माधुरी दीक्षितच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित आहे. माधुरीला अभिनेत्री बनवण्यामागे तिच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. भलेही रुपेरी पडद्यावर माधुरी दीक्षित झळकत असली तरी पडद्यामागे माधुरीच्या बहिणी तिच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. माधुरीच्या बहिणीदेखील ट्रेंड कथ्थक डान्सर आहेत पण त्यांनी कधी बॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला नाही.

माधुरी दीक्षितच्या बहिणी रुपा आणि भारती यांच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. मात्र या तिघी बऱ्याचदा एकत्र दिसतात. फोटोत त्या तिघींचे खूप छान बॉण्डिंग पहायला मिळते.

माधुरी दीक्षितला बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी जास्त स्ट्र्गल करावा लागला नाही. याबद्दलचा उल्लेख माधुरी दीक्षितने मुलाखतीत केला होता.

माधुरी दीक्षित म्हणाली होती की, मी कधीच विचार केला नव्हता की मी कधीच अभिनेत्री बनणार नाही. मला कधीच स्ट्रगल करावा लागला नाही. तुम्ही असे म्हणू शकता की चित्रपट स्वतःहून माझ्याकडे चालून आले होते.

टॅग्स :माधुरी दिक्षित