Join us

अमेरिकेतल्या मोठ्या कॉलेजमधून माधुरी दीक्षितचा मुलगा झाला पदवीधर, 'या' विषयात पूर्ण केलं शिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:47 IST

माधुरीचा मुलगा अरिन नेने हा परदेशात शिक्षण घेत होता

Madhuri Dixit Son Arin Nene : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची मुलं परदेशात शिक्षण घेऊन आपले नाव कमावत आहे. नुकतंच 'धकधक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या लेकाने अमेरिकेतल्या मोठ्या कॉलेजमधून शिक्षण पुर्ण केलं आहे. माधुरीचे पती डॉ राम नेने यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

माधुरीचा मुलगा अरिन नेने हा परदेशात शिक्षण घेत होता. अरिन याने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील 'विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग'मधून कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस या विषयात पदवी मिळवली आहे. नुकताच त्याचा पदवी प्रधान सोहळा पार पडला. त्यानिमित्त माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने हे तिथे गेले होते. लेकाची अतुलनीय कामगिरी पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या लेकासाठी खास अभिमानास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत मुलाचं कौतुक केलंय.

डॉ. नेने यांनी अरिनच्या कॉलेजमधील व्हिडीओ शेअर करत लिहलं, "अरिन नेने… 'विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग'मधून पदवीधर झाला आहे. पदवीधर झालेल्या सगळ्या मुलांना खूप शुभेच्छा आणि कॉलेजमधील प्राध्यापकांचे खूप खूप आभार… त्यांनी घेतलेली मेहनत, परिश्रम यामुळे या कॉलेजमधील सगळ्याच मुलांनी यशाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे".

 डॉ. नेने यांनी  शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक जण अरिनचे कौतुक करत आहेत. त्याला अनेकांनी पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. नेने  हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असतात. बऱ्याचदा ते त्याच्या जीवनातील लहान मोठे किस्से, घटना वा प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दरम्यान, माधुरी लवकरच 'मिसेस देशपांडे' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्यावर्षी 'भुल भुलैय्या ३'मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

 

टॅग्स :माधुरी दिक्षितशिक्षणअमेरिका