या व्हिलेनच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या मधुबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:00 IST
बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी मधुबाला होत्या, त्यांच्या सुंदरतेपुढे फक्त चाहते नाही तर बॉलिवूडमधील मोठे-मोठे दिग्गज ही घायाळ होते. ...
या व्हिलेनच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या मधुबाला
बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी मधुबाला होत्या, त्यांच्या सुंदरतेपुढे फक्त चाहते नाही तर बॉलिवूडमधील मोठे-मोठे दिग्गज ही घायाळ होते. बॉलिवूडचे सुपरस्टार दिलीप कुमार, शम्मी कपूर आणि प्रेमनाथ यांना त्यांच्याशी विवाह करायचा होता. मधुबाला यांनी पहिल्यांदा चित्रपट रेल का डिब्बामध्ये शम्मी कपूर यांच्यासोबत काम केले होते. त्यांना पाहता क्षणी शम्मी कपूर तिचे दिवाने झाले होता. शम्मी कपूर यांना त्यांच्याशी लग्न करायचे होते. त्यांनी यासाठी प्रयत्न ही केला मात्र ते अयशस्वी ठरले. तुम्हाला माहीत आहे का? मधुबाला यांचे एका अभिनत्यावर खूप प्रेम होते. त्यांना त्याच्याशी लग्न करायचे होते. शम्मी कपूरनंतर प्रेमनाथ मधुबालांच्या आयुष्यात आले. त्या दोघांनी खूप चित्रपट एकत्र केले, त्यात बादल, आराम आणि 'साकी नाम की' या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांच्यादरम्यान त्यांची जवळीक वाढत गेली. प्रेमनाथ यांना मधूबालांचे पाहिले प्रेम म्हटले जाते.मीडिया रिपोर्टनुसार प्रेमनाथ आणि मधूबाला एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. इतके प्रेम होते की ते लग्न ही करणार होते. ६ ते महिने एकत्र राहत होते पण धर्म वेगळा असल्यामुळे त्या दोघांचे नाते तुटले.काही काळापूर्वी मधुबाला यांची बहीण शाहिदाने दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. शाहिदा म्हणाल्या की आपा म्हणजेच मधुबाला यांचे प्रेमनाथ यांच्यावर प्रेम होते. पण हे नाते ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकले नाही. प्रेमनाथ यांची अट होती की मधुबाला यांनी हिंदू धर्म स्वीकारावा आणि आपल्याशी लग्न करावे, मधुबाला या मुस्लिमधर्मीय होत्या. धर्म बदलण्याची ही गोष्ट मधुबाला यांना मान्य नव्हती म्हणून त्यांनी या नात्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी गायक किशोर कुमार यांच्या सोबत विवाह केला. ALSO READ : मॅडम तुसादमधील मधुबालाचा ‘नुरानी’ अंदाज पाहिलातं?