Join us
Daily Top 2Weekly Top 5

​माधवन खूश्श!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 16:43 IST

अभिनेता आर. माधवन सध्या जाम खूश आहे. होय, अलबर्टा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘साला खडूस’ला विदेशी प्रेक्षकांनी दिलेली पसंती ...

अभिनेता आर. माधवन सध्या जाम खूश आहे. होय, अलबर्टा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘साला खडूस’ला विदेशी प्रेक्षकांनी दिलेली पसंती पाहून माधवन मनोमन सुखावला आहे. माधवन सध्या कॅनडात आहे. ‘साला खडूस’च्या स्क्रीनिंगदरम्यान तो अतिशय आनंदी दिसला. हा आनंद त्यांनी बोलूनही दाखवला. मी खूप आनंदी आहे. ‘साला खडूस’चे अलबर्टा चित्रपट महोत्सवात शानदार स्वागत झाले, असे माधवन म्हणाला.  सुधा कोंगरा दिग्दर्शित ‘साला खडूस’ या चित्रपटात माधवनने बॉक्सिंग कोचची भूमिका साकारली होती. गत जानेवारीला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.