खरं तर या खानची भविष्यावाणी दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांना कितपत गंभीरतेने घ्यावी, असाही प्रश्न आहे. कारण हा खान दुसरा-तिसरा कोणीही नसून, स्वत:ला बॉलिवूडचा सर्वांत मोठा क्रिटिक म्हणविणारा केआरके अर्थात कमाल आर. खान आहे. केआरकेने रणवीर आणि दीपिकाची भविष्यवाणी करणारी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी म्हटले होते की, सुशांत आणि अंकिताचे लग्न कधीच होणार नाही, ते खरं ठरलं. आज मी हेदेखील सांगतो की, रणवीर सिंग आणि दीपिकाचे लग्न कधीच होणार नाही.’
यानंतर केआरकेने आणखी एक ट्विट केले ज्यामध्ये लिहिले की, ‘हे दोघे लग्न यामुळे करणार नाहीत; कारण हे दोघे लव्हर्स नाहीत. हे दोघे केवळ चांगले मित्र आहेत.’ आता केआरकेची ही भविष्यवाणी कितपत सत्य ठरेल हे सांगणे मुश्किल आहे. परंतु केआरकेला असे का वाटत असावे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. असो, दीपिका आणि रणवीरच्या फॅन्सविषयी बोलायचे झाल्यास या दोघांना फॅन्सकडून ‘दीपवीर’ या नावाने संबोधले जाते. अशात या दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र यावे अशी चाहत्यांची इच्छा असेल यात दुमत नाही.
}}}} ">I said dat Sushant singh will never marry with Ankita n it's true today. I say 2day that Ranveer Singh won't marry with Deepika at any cost.}}}} ">— KRK (@kamaalrkhan) August 26, 2017