Join us

​बिग बी ‘नीरजा’च्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 06:45 IST

सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘नीरजा’ची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. बॉलीवूडचा शहंशाह अमिताभ बच्चनसुद्धा ‘नीरजा’ची स्तुती करीत थकताना दिसत ...

सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘नीरजा’ची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. बॉलीवूडचा शहंशाह अमिताभ बच्चनसुद्धा ‘नीरजा’ची स्तुती करीत थकताना दिसत नाहीत.चित्रपटाचा दिग्दर्शक राम माधवानीच्या कार्यकुशलतेचे तोंडभरून कौतुक करताना बिग बींनी ब्लॉगवर लिहिले की, ‘रामने एक असामान्य चित्रपट बनवला आहे. मला खरोखरच आश्चर्य वाटले की, त्याने इतका वास्तववादी चित्रपट बनवला. फिल्ममधील एकेकक गोष्टीवर खूप मेहनत घेतल्याचे स्पष्ट दिसते. सोनमसहित सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे; मात्र खरी शाबासकी मिळाली पाहिजे ती रामला. कारण कलाकारांकडून इतक्या उच्च दर्जाचे काम क रवून घेण्याचे कौशल्य दिग्दर्शकातच असणे गरजेचे असते.