Ayaan unveils the book!You guys can pre order the book here: http://amzn.to/1UdM0kr#TheKissOfLife Bilal Siddiqi
Posted by Emraan Hashmi on Wednesday, 30 March 2016
पाहा, मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ: इमरान हाश्मीचे पहिले पुस्तक, पहिली प्रत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 19:56 IST
अभिनेता इमरान हाश्मी याचा जीव की प्राण म्हणजे त्याचा मुलगा अयान. अयानला कॅन्सर आहे,म्हटल्यावर इमरान कोलमडून पडला होता. पण ...
पाहा, मनाला स्पर्शून जाणारा व्हिडिओ: इमरान हाश्मीचे पहिले पुस्तक, पहिली प्रत
अभिनेता इमरान हाश्मी याचा जीव की प्राण म्हणजे त्याचा मुलगा अयान. अयानला कॅन्सर आहे,म्हटल्यावर इमरान कोलमडून पडला होता. पण चिमुकल्या अयानने अपार धैर्याने कॅन्सरला परतवून लावले आणि इमरानच्या जीवात जीव आला. चिमुकल्या अयानने कॅन्सरशी दिलेली झुंज...इमरानने शब्दबद्ध केली आहे. अयानने कॅन्सरला कसे पळवून लावले, यावर इमरानने पुस्तक लिहिले आहे. बिलाल सिद्दीकी हा या पुस्तकाचा सहलेखक आहे. ‘दी किस आॅफ लाईफ’ नामक या पुस्तकाची पहिली प्रत इमरानच्या हातात आली..तशी त्याने ती अयानच्या हाती दिली. अयानने या पहिल्या प्रतीचे प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्याचा डोळ्यात पाणी आणणारा बाप व मुलाचा व्हिडिओ खुद्द इमरानने शेअर केला आहे. येत्या ११ एप्रिल रोजी ‘दी किस आॅफ लाईफ’ वाचकांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. तेव्हा बघाच संवेदनशील मनाला स्पर्शून जाणारा हा व्हिडिओ...