Join us

‘दंगल’ गर्लचा पहा सुपरहॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 18:34 IST

मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक तर केलेच शिवाय सिनेमातील हानीकारक बापूच्या मुलींच्या ...

मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक तर केलेच शिवाय सिनेमातील हानीकारक बापूच्या मुलींच्या भूमिकेत असलेल्या गीता आणि बबिता अर्थातच फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांना रातोरात स्टारही बनविले. या दोघींनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यातील त्यांचा सुपरहॉट लूक नेटिझन्सकडून जबरदस्त पसंत केला जात आहे. ‘दंगल’मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना घायाळ केले. परंतु या दोघींची ओळख केवळ ‘दंगल’पुरतीच मर्यादित नसून, सोशल मीडियावरील पोस्टमुळेही त्या नेहमीच प्रकाशझोतात असतात. कारण दोघीही सोशल मीडियावर नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतात. गेल्या बुधवारी सान्या मल्होत्रा हिने असाच एक फोटो शेअर केला असून, ज्यामध्ये दोघीही जबरदस्त हॉट अंदाजात दिसत आहेत. सान्या आणि फातिमाचा हा फोटो नुकत्याच केलेल्या एका प्रसिद्ध मॅगझिनच्या फोटोशूटमधील आहे. फोटोमध्ये दोघीही रेड हॉट लिपस्टिकमध्ये दिसत असल्याने त्यांचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे दोघीही दंगल अवतारात म्हणजेच शॉर्ट हेअर लूकमध्ये दिसत असल्याने त्यांच्या रूपात एकप्रकारे भरच पडली आहे. त्यावरून असेही लक्षात येते की, दंगलच्या अगोदर लांब केस ठेवणाºया या अ‍ॅक्ट्रेस शॉर्ट हेअर स्टाइलच्या जणूकाही प्रेमातच पडली आहे. या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली असून, दोघीही बºयाचदा एकत्र फिरताना बघावयास मिळाल्या आहेत. गीता फोगटच्या भूमिकेत असलेली सना फातिमा शेख ही एका टीव्ही शोमध्ये सुनेची भूमिका साकारताना यापूर्वी बघावयास मिळाली आहे. यामध्ये तिने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. सान्या मल्होत्रा हिचा ‘दंगल’ हा पहिलाच सिनेमा आहे. ती एक बॅले डान्सर आहे.