Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहाच: ‘दिन में करेंगे जगराता’मधील नवाजुद्दीनचा ‘क्रेझी डान्स’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 19:26 IST

‘फ्रीकी अली’चे ‘दिन में करेंगे जगराता’ हे गाणे आज रिलीज करण्यात आले. या गाण्यातील नवाजुद्दीनचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.

नवाजुद्दीन सिद्दीकी एखाद्या गाण्यावर बेधूंद होऊन थिरकतोय, हे दृश्य कदाचित आजपर्यंत तुम्ही पाहिलेले नसेल. पण ‘फ्रीकी अली’ या आगामी चित्रपटात तुम्हाला नवाजुद्दीनचा ‘क्रेझी डान्स’ पाहायला मिळणार आहे. होय,‘फ्रीकी अली’चे ‘दिन में करेंगे जगराता’ हे गाणे आज रिलीज करण्यात आले. या गाण्यातील नवाजुद्दीनचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. ‘फ्रीकी अली’च्या निमित्ताने  नवाजुद्दीनने प्रथमच ‘फनी अ‍ॅण्ड रोमॅन्टिक’ भूमिका साकारण्याचेआव्हान अंगावर घेतले आणि हे आव्हान पेलण्यात तो कमालीचा यशस्वीही झाला. ‘दिन में करेंगे जगराता’ या गाण्यातील नवाजुद्दीन पाहिल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल. तेव्हा बघा तर नवाजुद्दीनचा ‘क्रेझी डान्स’!