Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अनुष्का शर्माच्या शूजवर दिसतेय,‘ती’ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 12:47 IST

अनुष्का शर्मा सध्या ‘फिल्लोरी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘फिल्लोरी’तील शशी (अनुष्का या चित्रपटात शशी नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.) चंद्रावर पोहोचते तर कधी रणबीर कपूरच्या टॉवेल डान्सची टर उडवताना दिसते. पण आता शशी चक्क अनुष्का शर्माच्या शूजवर जावून बसली आहे.

अनुष्का शर्मा सध्या ‘फिल्लोरी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे, तिच्या प्रमोशन्सच्या त-हाही एकदम युनिक आहेत. होय, कधी ‘फिल्लोरी’तील शशी (अनुष्का या चित्रपटात शशी नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.) चंद्रावर पोहोचते तर कधी रणबीर कपूरच्या टॉवेल डान्सची टर उडवताना दिसते. पण आता शशी चक्क अनुष्का शर्माच्या शूजवर जावून बसली आहे.होय, विश्वास बसत नसेल तर अनुष्काने कॅरी केलेले हे शूज बघा. या पर्सनलाईज्ड शूजवर शशीचा चेहरा दिसतो आहे. मागे मोठ्या अक्षरात ‘फिल्लोरी’ असे लिहिलेले आहे. गोल्डन आणि सिल्व्हर रंगाचे हे शूज अनुष्का अगदी आनंदाने कॅरी करते आहे. केवळ एवढेच नाही तर या स्पेशल शूटचे अनेक व्हिडिओज आणि फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एकंदर काय तर, अनुष्काच्या भन्नाट डोक्यात भन्नाट आयडिया आहेत. ‘फिल्लोरी’चे प्रमोशन बघता तरी असेच वाटते.क्लिन स्लेट फिल्म आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित या चित्रपटात अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारताना दिसतेयं. इच्छा अतृप्त राहिल्याने अनुष्काची आत्मा भटकते आहे.   सूरज शर्मा हा सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मंगळ असल्याने सूरजला मुलीशी लग्न करण्याआधी गावातील एका झाडाशी विवाह करावा लागतो. मात्र हे लग्न होत असताना या झाडावर राहणारी एक अतृप्त आत्मा(अनुष्का शर्मा) सूरजसमोर येते आणि स्वत:ची एक अतिशय रोमांचक प्रेमकथा त्याला ऐकवते. अनुष्काचे दिलजीत दोसांजवर प्रेम असते. पण हे प्रेम अधुरे राहते,असे या चित्रपटाचे कथानक आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे.ALSO READ : ‘आॅस्कर’ नव्हे तर चंद्रावरही नील आर्मस्ट्रॉँगसोबत पोहचली अनुष्का शर्माअनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘फिल्लोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली होती.