Join us  

'लंडन से आया मेरा दोस्त'; शाहरुखच्या घरी पार्टी, बादशहाला भावला स्टार 'डेविड'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:29 PM

डेविड बेकहम यांनी अभिनेत्री सोनम कपूर आणि त्यांचे पती आनंद आहुजा यांच्या घरी पार्टीला उपस्थिती दर्शवली होती.

इंग्लंडचे प्रसिद्ध फुटबॉलपटू डेविड बेकहम सध्या भारत दौऱ्यावर असून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम लढतही ते पाहणार आहेत. मात्र, तत्पूर्वी भारत दौऱ्यावर ते अनेक बड्या सेलिब्रिटींची भेट घेत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सेमी फायनला सामन्यालाही त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी, विराट कोहलीच्या शतकांच्या अर्धशतक खेळीचंही त्यांनी कौतुक केलं. 

डेविड बेकहम यांनी अभिनेत्री सोनम कपूर आणि त्यांचे पती आनंद आहुजा यांच्या घरी पार्टीला उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर, बॉलिवूड बादशहाच्या मन्नत या निवासस्थानी डेविड यांनी हजेरी लावली. शाहरुखने डेविड यांच्या आगमनाप्रित्यर्थ एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी होती. शाहरुखने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन डेविडसोबत फोटो शेअर करत मित्रा असं म्हटलं आहे. 

कालची रात्र ही एका आयकॉन आणि जेंटलमॅनसोबत होती. मी नेहमीच त्यांचा चाहता राहिलो आहे. मात्र, त्यांची भेट घेतल्यानंतर आणि मुलांसोबत त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे त्यांचा दयाळू आणि जेंटल स्वभाव हा त्यांच्या फुटबॉलपेक्षाही एक पाऊल पुढे आहे, असे ट्विट किंग शाहरुख खानने केले आहे. तसेच, डेविड आणि त्याच्या कुटुंबाबद्दल प्रेम व्यक्त करत त्यांच्या सुखी व आनंदी जीवनासाठी प्रार्थनाही केली. तर, सर्वात शेवटी, डेविडने थोडसं झोपायलाही हवं, असं मजेशीर ट्विट शाहरुखने केले आहे. शाहरुख आणि डेविडचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, डेविडने आपल्या इंस्टा स्टोरीवरुन सोनम कपूरच्या घरी झालेल्या पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधील मेजवाणी व भारतीय पदार्थांचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. दाळ, पनीर, भातासह स्वादिष्ट मिष्ठान्नही दिसून येते. तसेच, नॉन व्हेज डिशेसचाही या जेवणात समावेश आहे. त्यानंतर, बदामवाल्या आईसक्रीमचा डेसर्टमध्ये समावेश होता.  

टॅग्स :शाहरुख खानइंग्लंडफुटबॉललंडनभारतीय क्रिकेट संघ