Join us

Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : दिमाखदार सोहळ्याला सुरवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 18:21 IST

महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाºया, राज्याचे नाव देशातच नव्हे तर जगात मोठं करणाºया आणि समाजासाठी सर्वस्व वेचणाºया कर्तृत्ववान व्यक्तींना ‘लोकमत’ समूहाच्या ...

महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाºया, राज्याचे नाव देशातच नव्हे तर जगात मोठं करणाºया आणि समाजासाठी सर्वस्व वेचणाºया कर्तृत्ववान व्यक्तींना ‘लोकमत’ समूहाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रीयन आॅफ द इअर  पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. महालक्ष्मी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी या पुरस्कारावर कोण-कोण शिलेदार मोहोर उमटवणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे, त्याचबरोबर रोखठोक संजय राऊत यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तरे देतात, याकडेही राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. * सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती* सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी सोहळ्याला उपस्थित* विविध क्षेत्रांमध्ये दमदार कामिगरी करणार्या रत्नांचा होणार सन्मान* शानदार नृत्याविष्कारानं  लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर २०१८ पुरस्कार सोहळ्याला सुरु वात* राजकारण, उद्योग, क्र ीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सोहळ्याला उपस्थित* सोहळ्याला अन्न आणि नागरी पुरवठा गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित* लोकमतच्या मंचावर  फर्जन  चित्रपटाची टीम; फर्जन चित्रपटाच्या टीमचा नृत्याविष्कार. १ जूनला प्रदर्शित होणार चित्रपट.* आपल्या खुमासदार शैलीत अमृता खानविलकरकडून सोहळ्याचे सूत्रसंचालन* डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली निवड प्रक्रि येची माहिती* अनन्या नाटकातील भूमिकेसाठी ऋतुजा बागवेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार* रंगभूमी पुरु ष या गटातील पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रदान, ट्रायोलॉजी या प्रयोगासाठी सन्मान* बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेचा क्र ीडा क्षेत्रातील कामिगरीसाठी गौरव; आकांक्षाच्या वतीनं तिच्या आईनं स्वीकारला पुरस्कार* नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख यांचा सन्मान; देशमुख यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला पुरस्कार* सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी विभागात जी. श्रीकांत यांना पुरस्कार.