लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे. सोशल मीडियावर स्वराची खिल्ली उडवणा-या अनेक tweetsचा पूर आला आहे.देशात पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचे चित्र सुरूवातीच्या निकालातून स्पष्ट होताच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी स्वराला लक्ष्य केले आहे. स्वरा ही कट्टर मोदी विरोधक मानली जाते. त्यामुळेच सोशल मीडियावर स्वराला लक्ष्य करणा-या tweetsचा जणू पूर आला आहे.
Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 13:04 IST
लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे.
Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर
ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वराने बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैया कुमार आणि दिल्लीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात भाग घेतला होता.