LMOTY 2018 : ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने करिना कपूरचा गौरव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 21:03 IST
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाºया अभिनेत्री करिना कपूर-खानला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’च्या भव्य सोहळ्यात ‘पॉवर आयकॉन’ ...
LMOTY 2018 : ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने करिना कपूरचा गौरव!
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाºया अभिनेत्री करिना कपूर-खानला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’च्या भव्य सोहळ्यात ‘पॉवर आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित केले. साडी परिधान करून आलेल्या करिनाने सोहळ्याच चार चॉँद लावले. ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त करताना विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरेही दिले. चित्रपटांमधील वेगळ्या धाटणीच्या भूमिका अतिशय सक्षमपणे साकारणाºया करीना कपूरचा सन्मान लोकमतकडून करण्यात आला. चित्रपट विनोदी असो वा गंभीर, करिनाने तिच्या सुंदर अभिनयाने सर्वच भूमिकांना उत्तम न्याय दिला. रेफ्युजी मधून २००१ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी करीना आजही तिच्या उत्तम अभिनयामुळे आघाडीची अभिनेत्री आहे. ‘रेफ्युजी’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणाºया करीनाच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. आपला फिटनेस जपत, अविरतपणे कष्ट करत करीनाने मिळवलेले यश तरुणांसाठी कायमच कौतुकाचा विषय ठरला. त्यामुळेच तिला लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात पॉवर आयकॉन पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. रेफ्युजी ते उडता पंजाब असा करीनाचा १६ वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. बॉलिवूडमध्ये भूमिका लिहिताना नायकांना दिले जाणारे प्राधान्य, इतर अभिनेत्रींकडून मिळणारी स्पर्धा या सगळ्यांचा यशस्वी सामना करत करिनाने तिचे वेगळे स्थान निर्माण केले. सैफ अली खानसोबतचे लग्न आणि तैमूरच्या जन्मानंतर करीना कपूरने थोडा ब्रेक घेतला. मात्र लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून करीना बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतेय. कुटुंब आणि करिअर अशी तारेवरची कसरत करत बॉलिवूडमधील स्थान आणखी भक्कम करण्याचा करीनाचा प्रयत्न आहे.