}}}} ">Anil Kapoor arrives at #Mumbai airport, chartered plane carrying mortal remains of #Sridevi to land shortly pic.twitter.com/raIx20n20h— ANI (@ANI) February 27, 2018
दरम्यान विमानतळावरून श्रीदेवी यांचे पार्थिव लोखंडवाला येथील ग्रीन एकर्स येथे घेऊन जाणार आहेत. श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत पती बोनी कपूर, दीर संजय कपूर, अनिल कपूर आणि अर्जुन कपूर आहेत. सध्या मुंबई विमानतळावर प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली असून, तेथून बाहेर पडण्यासाठी आणखी अर्धा तास वेळ लागण्याची शक्यता आहे.
अनिल कपूरसोबत विमानतळावर पोहोचले आहेत. विमानतळावर पोहोचताच अनिल कपूर यांना अश्रू अनावर झाले.
९.३५ : पुढील पाच मिनिटातच श्रीदेवी यांचे पार्थिव विमानतळाबाहेर आणण्यात येणार आहे. अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर, उद्योगपती अनिल अंबानी विमानतळावर पोहोचले आहेत.
दुबई येथून आलेल्या जेट विमानात श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत कुटुंबातील ११ सदस्यांचा समावेश आहे. त्यातील सहा सदस्य कपूर परिवारातील आहेत.
याच दरम्यान श्रीदेवी यांच्या पार्थिवाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर madhyamam.com या वेबसाइटचा वॉटरमार्क दिसत आहे. वास्तविक हा फोटो कसा व्हायरल होत आहे, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
श्रीदेवी यांचे पार्थिव आता मुंबई विमानतळावरून त्यांच्या राहत्या घराच्या दिशेने अॅम्बुलन्समध्ये घेऊन जात आहेत. विमानतळावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्याचबरोबर विविध स्तरातील लोकही विमानतळावर पोहाचले आहे. अमर सिंग हेदेखील विमानतळावर दाखल झाले आहेत. पुढच्या १५ ते २० मिनिटात श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी पोहोचणार आहे.
}}}} ">Mumbai: #Sridevi's mortal remains being taken to her Lokhandwala residence pic.twitter.com/uQiLy5EZcv— ANI (@ANI) February 27, 2018
श्रीदेवी यांचे पार्थिव विमानतळावरून थेट लोखंडवाला स्थित ग्रीन एकर्स या त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. असे सांगितले जात आहे की, चाहते आणि मीडियाची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी ऐनवेळी प्लॅन बदलला असून, श्रीदेवी यांचे पार्थिव दुसºया गेटमधून घरात नेले जाणार आहे.
उद्या दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जाणार आहे, तर सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे कपूर परिवाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.