छोटुशा अहिलचा क्युट फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 10:13 IST
सलमान खानची लहान आणि सर्वांत लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिचा क्युट मुलगा अहिलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल ...
छोटुशा अहिलचा क्युट फोटो!
सलमान खानची लहान आणि सर्वांत लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिचा क्युट मुलगा अहिलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता तो एक महिना आणि दोन दिवसांचा झाला आहे.अर्पिता-आयुष यांचे लग्न नोव्हेंबर २०१४ मध्ये हैदराबाद येथील ताज फलकनुमा येथे झाले. खान कु टुंबियांसाठी सध्या अहिल म्हणजे आकर्षणाचा विषय ठरला आहे. सलमानची बहीण अल्विरा अग्निहोत्री आणि दीर अतुल अग्निहोत्री हे सातत्याने अहिलला भेटण्यासाठी येत असतात.आजी सलमा खान देखील डोळयात तेल घालून छोटुशा अहिलला झोपी घालत असते. आयुष आणि अतुल यांनी इन्स्टाग्रामवर नुकतेच त्याचे फोटो शेअर केले आहेत. दिवस किती भरभर जात आहेत...पाहता पाहता अहिल एक महिन्यांचा झाला.