Join us

​बाप्पाची ही गाणी ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘गणपती बाप्पा मोरया...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 10:12 IST

गणेशोत्सवाच्या उत्साहात भर घालणारी काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बाप्पाच्या भक्तांच्या मनावर कोरली गेलेल्या या बॉलिवूड गाण्यांशिवाय गणेशोत्सव पूर्णच होऊ शकत नाहीत.

गणेशाचे आगमन झालेय. आता पुढील दहा दिवस घराघरांत विघ्नहर्त्याचे पूजन होईल आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह उत्साहाला भरते येईल. गणेशोत्सवाच्या याच उत्साहात भर घालणारी काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बाप्पाच्या भक्तांच्या मनावर कोरली गेलेल्या या बॉलिवूड गाण्यांशिवाय गणेशोत्सव पूर्णच होऊ शकत नाहीत. तर पाहू आणि ऐकू यात बाप्पाचा भक्त्ीने ओतप्रोत भरलेली अशीच काही गाणी...देवा श्री गणेशा (अग्निपथ)बॉलिवूडच्या बाप्पावर आधारित गाण्यांमध्ये हे गाणे अगदी पहिल्या क्रमांकावर येतेच येते. हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘अग्निपथ’मधील ‘देवा श्री गणेशा’ हे गाणे कुण्याही बाप्पाच्या भक्ताला आवडेल असेच आहे.देवा हो देवा (हमसे बढकर कौन)९० च्या दशकात आलेल्या ‘हमसे बढकर कौन’ हा चित्रपट भलेही प्रेक्षकांच्या स्मरणात नसो. पण यातील ‘देवा हो देवा’ हे गाणे गणेशोत्सवात हमखास आठवतेच आठवते. मिथुन चक्रवर्ती, अमजद खान, डॅनी, विजयेन्द्र घाटगे यांच्या डान्सने हे गाणे आणखीच यादगार बनवले.गणेश आरती(वास्तव)संजय दत्तचा ‘वास्तव’ हा चित्रपट तुफान गाजला होता. तसेच यातील गणेश वंदना अर्थात गणेश आरतीही खूप गाजली होती. बाप्पाचे गुणगान करणारी ही आरती अंगावर रोमांच उभे करते.गणपति अपने गांव चले (अग्निपथ)‘अग्निपथ’ या चित्रपटातील हे गाणे अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रीत करण्यात आले आहे. आजही गणेशोत्सवादरम्यान हे गाणे प्रचंड एन्जॉय केले जाते.श्री गणेशाय धीमहि(विरूद्ध)‘विरूद्ध’ या चित्रपटात शंकर महादेवन यांनी गायलेले  हे गाणे तुम्ही ऐकायलाच हवे. अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, संजय दत्त आणि जॉन अब्राहम यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.तुझको फिर से जलवा (डॉन)‘डॉन’ या चित्रपटातील बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘तुझको फिर से जलवा’ या गाण्यानेही बाप्पाच्या भक्तांची मने जिंकलीत. शाहरूखच्या जबरदस्त डान्समुळेही हे गाणे अपार लोकप्रीय झाले.मेरा ही जलवा (वॉन्टेड)बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान याच्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातील ‘मेरा ही जलवा’ हे गाणेही असेच. गणेशोत्सवाच्या काळात या गाण्याचे स्मरण हमखास होते.