Join us

​लीजा हेडनने शेअर केला ‘ब्रेस्टफीडिंग’चा फोटो! क्षणात झाला व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 14:03 IST

अभिनेत्री लीजा हेडन सध्या तिच्या बाळाच्या संगोपनात व्यस्त आहे. प्रेग्नंसीदरम्यान टू पीसमध्ये बेबी बम्प दाखवणा-या लीजाने आता आपल्या मुलासोबत ब्रेस्टफीडिंग वीक अर्थात स्तनपान सप्ताह साजरा केलाय.

कंगना राणौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री लीजा हेडन सध्या तिच्या बाळाच्या संगोपनात व्यस्त आहे. प्रेग्नंसीदरम्यान टू पीसमध्ये बेबी बम्प दाखवणा-या लीजाने आता आपल्या मुलासोबत ब्रेस्टफीडिंग वीक अर्थात स्तनपान सप्ताह साजरा केलाय. गत मे महिन्यात लीजाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. जॅक असे त्याचे नाव. जॅकसोबतचे अनेक फोटो लीजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ताज्या फोटोत ती जॅकला बे्रस्टफीडिंग करताना दिसतेय. या फोटोसोबत तिने स्तनपानाचे महत्त्वही बोलून दाखवले आहेत. ‘एका बाळाची आई झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात काय बदलले? असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. विशेषत: फिटनेस व वजनाबाबत. या ब्रेस्टफीडिंग वीकमध्ये मी याचे क्रेडिट बे्रस्टफिडिंगला देऊ इच्छिते. बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपानाने मला माझ्या शेपमध्ये परत येण्यात मोठी मदत केली. स्तनपान करणे खरोखरच कसोटीचे आणि वेळ घेणारी गोष्ट आहे. (रोज जॅकला दूध पिण्यासाठी तयार करण्यात अनेक तास जातात.) पण स्तनपान हा बाळासोबत ‘कनेक्ट’ होण्याचा एक सुंदर मार्ग आहे. शिवाय यातून बाळाला पोषणही मिळते. माझा ब्लॉग mycityforkids.comवर स्तनपानाबाबत वाचा. हॅपी ब्रेस्टफिडिंग वीक,’ असे लीजाने लिहिले आहे.ALSO READ : ...आपल्या चिमुकल्याला जीवापाड जपतेय लीजा हेडन!!लीजा ब्रेस्टफिडिंग करतानाचा फोटो सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. या फोटोसोबतच हा ब्रेस्टफीडिंग वीक साजºया करणाºया अभिनेत्रींच्या यादीत लीजा सामील झाली आहे. जेनिफर गार्नरपासून तर मिला कुनीस आणि बियॉन्सेपर्यंत अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखीत करत, स्तनपान सप्ताह साजरा केलाय. भारतात रवीना टंडनपासून लारा दत्त पर्यंत अनेक अभिनेत्रींना यास पाठींबा दिला आहे. यंदा २५ वा स्तनपान सप्ताह साजरा होत आहे.