Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटिनम हेअरनंतर लीजा हेडनने धारण केला नवा लूक; बीचवर काहीशा अशा अंदाजात दिसली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 16:44 IST

हॉट अभिनेत्री लीजा हेडनने आता नवा लूक धारण केला असून, त्याबाबतचे काही फोटोज् तिने शेअर केले आहेत. त्यामध्ये ती अतिशय हॉट अंदाजात बघावयास मिळत आहे.

‘क्वीन, शौकिन्स आणि हाउसफुल-३’सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री आणि मॉडेल लीजा हेडन सोशल मीडियामुळे चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक लीजा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. परंतु सोशल मीडियाद्वारे ती सातत्याने तिचे फोटो शेअर करीत असल्याने चाहत्यांच्या संपर्कात आहे. यावेळेसदेखील लीजाने आपले हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावरील वातावरण हॉट केले आहे. तिचे हे फोटो चाहत्यांकडून प्रचंड पसंत केले जात असून, त्यास मोेठ्या संख्येने लाइक्स आणि कॉमेण्ट्स दिल्या जात आहेत. 

लीजाने तिचे हे सर्व हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती स्विमसूटमध्ये दिसत आहे. लीजाचे हे फोटो डोना सिल्विया बीच रिजॉर्ट येथील आहेत. वास्तविक लीजा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिचे अशाप्रकारचे फोटो शेअर करीत असते. यावेळेसदेखील तिने काहीशा अशाच अंदाजात फोटो शेअर केले आहेत. नुकतेच तिने मित्रांसोबतचे काही फोटोज् शेअर करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 
 
लीजा बºयाच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. ती एमटीव्हीच्या ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन १ आणि २ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा हटके लूक समोर आला होता. तिच्या या न्यू हेअरस्टाइलमधील लूकची त्यावेळी चांगली चर्चाही रंगली होती. त्यावेळी लीजाने आपल्या केसांना प्लॅटिनम कलर दिला होता. या लूकमध्ये ती अतिशय हटके अंदाजात दिसत होती. 
 
तिने धारण केलेल्या या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोलही झाली होती. आता पुन्हा एकदा तिने आपला लूक बदलला असून, त्यातही ती जबरदस्त हॉट दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.