Join us

शाहीद-मीराच्या आयुष्यात ‘मौजा ही मौजा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 14:12 IST

शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्नच पडला असेल की, शाहीद आणि मीराच्या आयुष्यात असे काय होत आहे की, त्यासाठी ‘मौजा ही ...

शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्नच पडला असेल की, शाहीद आणि मीराच्या आयुष्यात असे काय होत आहे की, त्यासाठी ‘मौजा ही मौजा’ म्हणावं. तर काही दिवसांपूर्वी मिळालेली अफवा ही अफवा नसून खरी बातमी असल्याचे उघडकीस आले आहे.मीरा राजपूत कपूर ही प्रेगनंन्ट असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. आणि हो.... सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीरा दोन महिन्यांनी गरोदर आहे. ही बातमी शाहीद कपूरची जवळची मैत्रीण मसाबा गुप्ता हिने इन्स्टाग्रामवर फोटोसह अपलोड केली आहे.शाहीद आणि मीरा हे जुलै ७ ला छत्तरपूर येथील बंगल्यात विवाहबद्ध झाले. सिखसोबत असलेला हा आनंद कारज सोहळा  होता. मधु आणि मसाबा हे दोघे त्या विशिष्ट पाहुण्यांपैकी एक होते.वेल, एकंदरित काय तर शाहीद-मीरा यांच्या आयुष्यात आता सगळं अलबेल आणि मौजा ही मौजाच असणार आहे.