Join us

पावसामुळे ‘पिंक’ ची लाँचींग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 15:11 IST

सध्या पावसाळा सुरु असल्याने, अनेकजण त्याचा आनंद घेत आहेत. तर काही जणांच्या योजनावर मात्र, सततच्या या पावसामुळे पाणी फिरत ...

सध्या पावसाळा सुरु असल्याने, अनेकजण त्याचा आनंद घेत आहेत. तर काही जणांच्या योजनावर मात्र, सततच्या या पावसामुळे पाणी फिरत असल्याचे दिसत आहे. अगदी अमिताभ बच्चनसोबत असेच घडले. ‘पिंक’ हा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाचा फर्स्ट लूकचे शुक्रवारी लाँचींग करण्यात येणार होते. मात्र, जोरदार पावसामुळे ही लाँचींग रद्द करावी लागली. अन्यथा पाऊस नसता तर अमिताभच्या पिंक या चित्रपटाचा फर्स्ट लूक आपल्याला पाहता आला असता. यामध्ये अमिताभ सोबत तपासी पन्नू गंभीर भूमिका साकारत आहे. अमिताभच्या यावर्षी आतापर्यंत ‘वजीर’ व ‘तीन पत्ती’ सारखे सस्पेंस-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पिंक च्या शुटींगसाठी अमिताभ हे दिल्लीला आले होते, मात्र, ते कु णालाही ओळखता येणार नाही असा लूक मध्ये होते. त्यामुळे अमिताभला कुणीही ओळखू शकले नाहीत. नंतरला अमिताभने फोटो शेअर करुन,ही माहिती दिली.