Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सत्यासाठी सर्व एकत्र येऊयात', सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने केले चाहत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 12:05 IST

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. त्यात त्याचे चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. यादरम्यान सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. यात त्यांनी सुशांतला आत्महत्या करण्यास तिने प्रवृत्त केले आणि बरेच आरोप केले आहेत. त्यानंतर आता सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने एक पोस्ट शेअर केली आहे.

श्वेता सिंग किर्तीने पोस्ट शेअर करत लिहिले की, सत्यासाठी एकत्र येऊयात. यासोबत तिने चाहत्यांना आवाहन केले आहे कोणीही कोणासाठीही अपशब्द वापरू नका. न्यायासाठी लढायचे आहे तर एकत्र आले पाहिजे.

यापूर्वीदेखील श्वेता सिंग किर्तीने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते की, जर सत्य महत्त्वाचे नाही तर काहीच महत्त्वाचे नाही. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

अलीकडेच सुशांतचे वडील के के सिंह यांनी एफआयआर दाखल करून रिया आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतचे वडील म्हणतात की, रियाने फक्त आपल्या मुलाची मानसिक स्थिती बिघडविली आणि ड्रग ओव्हरडोजही दिला. तसेच के के सिंह पुढे म्हणाले की, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती