Join us  

'मोहोब्बते' विषयी जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या या गोष्टी, आहेत खूपच इंटरेस्टिंग हे किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 9:00 PM

'मोहोब्बते' या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.

ठळक मुद्दे'मोहोब्बते' या चित्रपटात अमिताभ यांच्या पत्नीची भूमिका श्रीदेवी यांना ऑफर करण्यात आली होती. पण श्रीदेवी यांनी या चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर या चित्रपटातून ही भूमिकाच वगळण्याचा निर्णय दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला होता.

'मोहोब्बते' हा चित्रपट 2000 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटाविषयी आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

'मोहोब्बते' या चित्रपटात अमिताभ यांच्या पत्नीची भूमिका श्रीदेवी यांना ऑफर करण्यात आली होती. पण श्रीदेवी यांनी या चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर या चित्रपटातून ही भूमिकाच वगळण्याचा निर्णय दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला होता. तसेच अमिताभ यांचे या चित्रपटातील कपडे करण जोहरने डिझाइन केले होते. 

'मोहोब्बते' या चित्रपटात शमिता शेट्टीची भूमिका करिश्मा कपूरला तर किम शर्माची भूमिका काजोलला ऑफर करण्यात आली होती. त्या दोघींनी या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला असल्याने या अभिनेत्रींची वर्णी लागली. 

शाहरुख खानने 'मोहोब्बते' या चित्रपटाची कथा न वाचताच या चित्रपटात काम करण्याचे ठरवले होते. तसेच या चित्रपटातील त्याचे आर्यन हे नाव त्याच्या मुलावरून ठेवण्यात आले होते. तसेच या चित्रपटातील गुरूकुलचा सेट थेट इग्लंडमध्ये लावण्यात आला होता. 

'मोहोब्बते' या चित्रपटात प्रेक्षकांना तीन जोड्यांची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील हे सहादेखील कलाकार नवोदित होते. त्यांना चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या सहा महिने आधीपासून तालमी देण्यात आल्या होत्या. 

'मोहोब्बते' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या रायचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे या चित्रपटात माधुरी अथवा काजोल या त्याच्यावेळेच्या आघाडीच्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असतील असा लोकांनी अंदाज लावला होता.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटानंतर आदित्य चोप्राने दिग्दर्शित केलेला 'मोहोब्बते' हा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटाने अमिताभ यांच्या करियरला नवीन दिशा दिली.

टॅग्स :अमिताभ बच्चनशाहरुख खानऐश्वर्या राय बच्चनकाजोलमाधुरी दिक्षितकरण जोहरआदित्य चोप्रा