जाणून घ्या, झहीर खान व सागरिका घाटगेच्या Winter Weddingचा प्लान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 10:14 IST
क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हेजल किच यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. आता अशाच एका लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. होय, क्रिकेटपटू ...
जाणून घ्या, झहीर खान व सागरिका घाटगेच्या Winter Weddingचा प्लान?
क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हेजल किच यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. आता अशाच एका लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. होय, क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या ‘विंटर वेडिंग’कडे चाहते डोळे लावून बसले आहेत. गत एप्रिल महिन्यात झहीर व सागरिका यांचा साखरपुडा झाला होता. झहीरने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी शेअर केली होती. लवकरच हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. अर्थात लग्नाची तारिख अद्याप ठरलेली नाही. पण यावर्षाच्या अखेरिस हा ग्रॅण्ड सोहळा होणार आहे. सागरिकाने याच लग्नाचा ‘न ठरलेला प्लान’ शेअर केला आहे. ‘न ठरलेला प्लान’ यासाठी की, अद्याप या लग्नाची कुठलीही तयारी सुरु झालेली नाही. लग्नासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. पण विश्वास ठेवा, अद्याप लग्नाची तारिख ठरलेली नाही. पण यावर्षाअखेरिस हे लग्न होईल, एवढेच मी सांगेल, असे सागरिकाने सांगितले. आता तारिख ठरलेली नसली आणि वर्षाअखेरिस लग्न आहे म्हटले तरी, सागरिका व झहीरने या लग्नाची तयारी नक्कीच सुरु केली असेल, असे तुम्हाला वाटेल. पण सागरिकाचे खरे मानाल तर अद्याप कशातही काही नाही. सागरिका सांगते, ‘तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण अद्याप आम्ही कुठलीही शॉपिंग केलेली नाही. अद्याप लग्नाचा हॉलही बुक झालेला नाही. ही सगळी तयारी करताना ताण येतो. कारण जेव्हा केव्हा आम्ही याबद्दल बोलतो, तेव्हा आता फार वेळ उरलेला नाही, असे आमच्या लक्षात येते. आता या इतक्या कमी वेळात सगळे कसे करता येईल, याचा विचार आम्ही चालवला आहे.’आता या लग्नाची तयारी कशी का होईना, पण हा सोहळा ग्रॅण्ड होणार, हे मात्र नक्की. सागरिका व झहीरची भेट एका कॉमन फ्रेन्डने करून दिली होती. साखरपुड्याआधी हे दोघे जवळपास दीड वर्षे एकमेकांना डेट करत होते. अर्थात त्यांनी याची भनकही कुणाला लागू दिली नव्हती.