Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, सेलिब्रिटींनी ‘या’ चित्रपटांमधील अभिनयासाठी घेतला नाही एक रूपयाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 11:30 IST

अबोली कुलकर्णीबॉलिवूड म्हणजे जादूई दूनिया...प्रचंड पैसा, ग्लॅमर आणि नाव मिळवून देणारं एक मायाजाल... एक  चित्रपट हिट झाला की, ...

अबोली कुलकर्णीबॉलिवूड म्हणजे जादूई दूनिया...प्रचंड पैसा, ग्लॅमर आणि नाव मिळवून देणारं एक मायाजाल... एक  चित्रपट हिट झाला की, मग काय पैसाच पैसा मिळतो. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात पैशांच्या मागे धावणारे अनेक कलाकार आपण पाहतो. पण, तुम्हाला हे माहितीये का की, असेही काही कलाकार ‘बी टाऊन’ मध्ये आहेत ज्यांनी अभिनय, माणूसकी, नातेसंबंध जपण्यासाठी चित्रपट करत असताना निर्मात्याकडून एक रूपया देखील घेतला नाही. जाणून घ्या मग कोण आहेत हे कलाकार....* शाहिद कपूरशाहिद कपूरला २०१५ मध्ये ‘हैदर’ या चित्रपटासाठी ‘फिल्म फेयर अ‍ॅवॉर्ड’ मिळाला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे समीक्षकांनी खूप कौतूक केले. पण, तुम्हाला माहितीये का, शाहिदने या चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नव्हता. ‘हैदर’ हा चित्रपट त्याच्यासाठी एक टर्निंग पॉर्इंट ठरला.* कॅटरिना कैफचिकनी चमेली कॅटरिना कैफ हिने करण जोहरच्या ‘अग्निपथ’ चित्रपटात एक आयटम साँग केले होते. या गाण्यातील तिचा हॉट अंदाज सर्वांनाच प्रचंड भावला होता. या गाण्यासाठी तिने मेहनतही खुप केली होती. पण, तिने या गाण्यासाठी काहीही चार्जेस घेतले नव्हते. * प्रियांका चोप्राअभिनयाच्या बळावर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिने ‘बिल्लू’ या चित्रपटात एका गाण्यात काम केले आहे. यासाठी काम करताना ती म्हणाली की, मी पैशांसाठी गाण्यात काम करत नाही तर केवळ शाहरूखसोबतच्या मैत्रीसाठी हे करत आहे. * दीपिका पादुकोण‘ओम शांती ओम’ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. या पहिल्याच चित्रपटापासून तिने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या चित्रपटासाठी शाहरूख खानसोबत काम करण्याचे तिने काहीच पैसे घेतले नव्हते. तिला वाटत होते की, पहिल्याच चित्रपटात शाहरूखसोबत काम करायला मिळणे ही तिच्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी एक पैसाही आकारला नाही. * शाहरूख खान‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटात शाहरूख खानने जेवढे काम केले, ते फ्री मध्ये केले होते. शाहरूख या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होता. दुसऱ्या  भागातील त्याच्या छोट्याशा भूमिकेसाठी त्याने कोणतेही चार्जेस घेतले नव्हते. * करिना कपूर ‘बिल्लू’ चित्रपटातील ‘मरजानी-मरजानी’ हे गाणं आठवतंय का? करिना कपूर खानने या गाण्यावर डान्स करण्यासाठी काहीच फीस घेतली नव्हती. कारण हे शाहरूख खानच्या चित्रपटातील गाणे होते. या गाण्याचे शूटींग झाल्यानंतर करिनाला एक चेक पाठवण्यात आला. मात्र, तिने तो निर्मात्याला परत पाठवला. एवढेच नाही, तर सलमानच्या ‘दबंग २’ मधील ‘फेव्हिकॉल सा’ या गाण्यात फ्री मध्ये काम केले होते. * राणी मुखर्जीकरण जोहर हा राणी मुखर्जीचा बेस्ट फ्रेंड आहे. करणचा चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ यात राणीने शाहरूखच्या लहानपणीच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. ती चित्रपटात फार कमी वेळा दिसत होती. त्यामुळे छोट्याशा भूमिकेसाठी तिने करणकडून कुठलेही चार्जेस घेतले नाहीत.* सोनम कपूरमिल्खा सिंगच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ हा उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. यात फरहान अख्तर सोबत सोनम कपूर काही थोड्या कालावधीसाठीच दिसली होती. मात्र, तिने या चित्रपटात काम करण्यासाठी अतिशय कमी म्हणजे केवळ ११ रूपयेच घेतले होते. * सोनाक्षी सिन्हा  खिलाडी अक्षय कुमारसोबत बऱ्याच चित्रपटात काम करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. ‘बॉस’ या चित्रपटातील एका गाण्यात  तिने अक्कीसोबत काम केले होते. यासाठी तिने काहीच पैसे घेतले नव्हते. तिने त्याच्यासोबत ‘रावडी राठौड’,‘जोकर’, ‘बेबी’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.