Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आमिरकडून शिका पाहुण्यांना जा म्हणण्याची कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 11:48 IST

मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या सगळ्याच गोष्टीत पर्फेक्ट वागतो. अगदी घरी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा कसं घरी जायला सांगायचे याची त्यानी ...

मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या सगळ्याच गोष्टीत पर्फेक्ट वागतो. अगदी घरी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा कसं घरी जायला सांगायचे याची त्यानी स्पेशल तयारी केलेली असते. नुकतेच त्याने तो कसा पाहुण्यांना बाहेरचा रस्ता कसा दाखवतो याबद्दल सांगितले.तो म्हणाला की, ‘आमच्या घरी लोक आल्यावर मला जेव्हा वाटते की आता त्यांनी जावे तर मी त्यांना म्हणतो, ‘तुम्हाला भेटू खूप आनंद झाला!’ ही माझी पाहुण्यांना विनम्रपणे घरी जा असे सांगण्याची पद्धत आहे. त्यामुळे जर कधी माझ्या घरी आला आणि मी तुम्हाला असे म्हणालो तर समजुन जा की, निघण्याची वेळ झाली आहे.आमिर त्याचे मामा नासिर हुसैन यांच्या जीवनचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होता. हे वाक्य त्याने मामाकडूनच शिकलो असल्याचे सांगितले. तो म्हणतो, ‘लहानपणी आम्ही नासिर साहेबांच्या घरीच पडून असायचो. आम्ही सगळं लहान मुलं त्यांच्या घरी जमून एकत्रित जेवण करायचो. ते आमचा खूप लाड करायचे. पण जेव्हा त्यांच्या झोपायची वेळ व्हायची ते म्हणायचे की, ‘तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.’ मग आम्हाला कळून जायचे की, आत जाण्याची वेळ झाली आहे. हीच सवय मग मलासुद्धा लागली.आमिरच्या या मजेशीर किश्शामुळे उपस्थितांमध्ये हास्य उमटले. पत्रपरिषेदेच्या शेवटी आमिरने हेच वाक्य वापरून पुन्हा एकदा हशा पिकवला.