या वेडिंग कार्डातील एक खास गोष्ट म्हणजे, यावर नागार्जुन व त्याची पत्नी अमला या दोघांसोबतच चैतन्यची ‘बायोलॉजिकल’ आई लक्ष्मी हिचेही नाव आहे. लक्ष्मी नागार्जुनची पहिली पत्नी आहे. ती डी. रामानायडू यांची मुलगी आणि सुरेश बाबू व व्यंकटेशची बहीण आहे. लक्ष्मीला घटस्फोट दिल्यानंतर नागार्जुनने १९९२ मध्ये अमलासोबत लग्न केले होते. लक्ष्मी व नागार्जुन यांचा मुलगा चैतन्य सध्या पित्यासोबतच राहतो. मात्र त्याच्या लग्नाची संपूर्ण तयारी आई लक्ष्मी आणि मामेभाऊ राणा डुग्गुबती हे दोघे करताहेत. चैतन्य व समंथा यांच्या या ग्रॅण्ड वेडिंगसाठी गोव्यातील एक हॉटेल बुक करण्यात आले आहे.
ALSO READ : नागार्जुनच्या ‘बोल्ड’ सूनेचे ‘बोल्ड’ विधान! म्हणे, जेवणापेक्षा सेक्स अधिक आवडेल!!
चैतन्य व समन्था यांची पहिली भेट गौतम वासुदेव मेनन यांच्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटादरम्यान झाली होती. ‘ये माया चेसावे’ हा एक रोमॅन्टिक चित्रपट होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम बहरले. यानंतर ‘आॅटोनगर सूर्या’ आणि ‘मनम’ यासारख्या चित्रपटांत चैतन्य व समन्था हे दोघे एकत्र दिसले. गतवर्षी चैतन्य व समन्था या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मात्र आम्ही दोघे केवळ चांगले मित्र आहोत, असे सांगून समन्थाने या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. सिनेसृष्टीत माझा सर्वांत जवळचा आणि चांगला मित्र कोण असेल तर तो चैतन्य आहे, असे ती म्हणाली होती. अर्थात हाच चांगला मित्रचं समन्थाचा ‘जीवनसाथी’ होणार आहे, हे मात्र तिने दडवून ठेवले होते.