Join us

LEAKED : शाहरुख-आलियाच्या फिल्मचा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 08:52 IST

जेव्हापासून शाहरुख-आलियाची युनिक जोडी ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम दिग्दर्शिका गौरी शिंदेच्या पुढच्या सिनेमात काम करणार याची घोषणा झाली आहे तेव्हापासून ...

जेव्हापासून शाहरुख-आलियाची युनिक जोडी ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम दिग्दर्शिका गौरी शिंदेच्या पुढच्या सिनेमात काम करणार याची घोषणा झाली आहे तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तुम्हीसुद्धा जर त्यांपैकी असाल तर ही बातमी वाचून तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही.कारण या चित्रपटाच्या सेट वरील फोटो लिक झाला आहे. शाहरुख आणि आलिया सध्या गोव्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. लिक झालेल्या फोटोमध्ये ते दोघे फेरीवर (प्रवासी जहाज) आहेत. तिथे मेकअप बॉय आरसा घेऊन उभा आहे. परंतु लक्षात राहते ती आलिया! एकदम रिलॅक्स आणि गुड मूडमध्ये दिसत आहे. समर ड्रेस आणि खांद्यावर बॅग असा तिचा लूक आहे.चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून रिलिज डेटबाबतही ठोस माहिती नाही. परंतु हा फोटो पाहून दोघांचेही चाहते खूश होणार हे नक्की. फोटो क्वालिटी जरी ठिक नसली तरी सध्या यापेक्षा मोठी गोष्टी काय असू शकते?