Join us

ग्रेट ग्रँड मस्ती प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:50 IST

मस्ती या चित्रपटाचा सिक्वल असलेला ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ...

मस्ती या चित्रपटाचा सिक्वल असलेला ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या जवळजवळ 15 दिवस आधीच ऑनलाईन आलेला आहे. या चित्रपटाची सेन्सॉर कॉफी लीक झाली आहे. काही दिवसांपूर्वी उडता पंजाब या चित्रपटाच्याबाबतीत अशीच घटना घडली होती. उडता पंजाब प्रदर्शित व्हायच्या आदल्या दिवशी या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक झाली होती. विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाची कॉपी काही सव्हर्सवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाली आहे. उडता पंजाब या चित्रपटाच्यावेळी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली होती. ग्रेट ग्रँड मस्तीच्या बाबतीत कोणती कारवाई होते हे काही दिवसांतच कळेल. पण हा चित्रपट प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ऑनलाईन लीक झाल्यामुळे याचा चित्रपटाच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम होईल असे म्हटले जात आहे.